हे ऐकताच इय्योब उठला आणि त्याने आपला झगा फाडला आणि डोक्यावरून वस्तरा फिरविला. नंतर जमिनीवर पडून त्याने उपासना केली आणि म्हणाला:
“आईच्या उदरातून मी नग्न आलो,
आणि नग्नच मी परत जाईन,
याहवेहने दिले आणि याहवेहने परत घेतले;
त्या याहवेहचे नाव धन्यवादित असो.”
या सर्व बाबतीत, इय्योबाने पाप केले नाही किंवा परमेश्वराने अयोग्य केले असा दोष त्यांच्यावर लावला नाही.