1
रोमकरांस 14:17-18
मराठी समकालीन आवृत्ती
परमेश्वराचे राज्य खाणे व पिणे यांत नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्याद्वारे मिळणारा आनंद यात आहे. कारण जो अशाप्रकारे ख्रिस्ताची सेवा करतो तो परमेश्वराला संतोष देणारा व मनुष्यांनी पारखलेला आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा रोमकरांस 14:17-18
2
रोमकरांस 14:8
आपण जगतो ते प्रभुकरिता जगतो; आणि आपण मरतो ते प्रभुकरिता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो, तरी प्रभुचे आहो.
एक्सप्लोर करा रोमकरांस 14:8
3
रोमकरांस 14:19
तर मग जेणेकरून शांती व परस्परांची वृद्धी होईल अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे.
एक्सप्लोर करा रोमकरांस 14:19
4
रोमकरांस 14:13
यास्तव आपण यापुढे एकमेकांना दोषी ठरवू नये; तर असा निश्चय करावा की कोणी आपल्या बंधू किंवा भगिनीपुढे काही विघ्न किंवा अडखळण ठेवू नये.
एक्सप्लोर करा रोमकरांस 14:13
5
रोमकरांस 14:11-12
कारण असे लिहिले आहे: “ ‘प्रभू म्हणतात, मी जिवंत आहे म्हणून,’ ‘प्रत्येकजण मजपुढे गुडघा टेकील; व प्रत्येक जिव्हा परमेश्वराचा स्वीकार करेल.’ ” तर मग आपणातील प्रत्येकजण स्वतःचा हिशोब परमेश्वराला देईल.
एक्सप्लोर करा रोमकरांस 14:11-12
6
रोमकरांस 14:1
जो विश्वासाने दुर्बळ त्याचा स्वीकार करा, तरी वादविवादाच्या गोष्टींमुळे भांडणे करू नका.
एक्सप्लोर करा रोमकरांस 14:1
7
रोमकरांस 14:4
दुसर्याच्या चाकराचा न्याय करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? चाकराचे स्थिर राहणे किंवा पतन यासाठी त्याचा धनी जबाबदार आहे आणि त्यांना स्थिर करण्यात येईल, कारण प्रभू त्यांना स्थिर करण्यास समर्थ आहे.
एक्सप्लोर करा रोमकरांस 14:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ