1
मत्तय 27:46
मराठी समकालीन आवृत्ती
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येशूंनी मोठ्याने आरोळी मारली, “एली, एली, लमा सबकतनी,” म्हणजे, “माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?”
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्तय 27:46
2
मत्तय 27:51-52
त्याच क्षणाला, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला, पृथ्वी हादरली आणि खडक फुटले आणि कबरा उघडल्या आणि मृत पावलेल्या अनेक पवित्र लोकांची शरीरे पुन्हा उठविली गेली.
एक्सप्लोर करा मत्तय 27:51-52
3
मत्तय 27:50
मग येशूंनी पुन्हा एकदा मोठी आरोळी मारली आणि आपला प्राण सोडला.
एक्सप्लोर करा मत्तय 27:50
4
मत्तय 27:54
जेव्हा शताधिपतीने आणि त्याच्याबरोबर येशूंवर पहारा करणारे रोमी शिपाई यांनी भूकंप आणि घडलेल्या इतर सर्वगोष्टी पाहिल्या, तेव्हा ते अत्यंत भयभीत झाले, आणि त्यांनी उद्गार काढले, “खरोखरच हा परमेश्वराचा पुत्र होता!”
एक्सप्लोर करा मत्तय 27:54
5
मत्तय 27:45
त्या दिवशी दुपारपासून तीन वाजेपर्यंत सर्व प्रांतावर अंधार पडला.
एक्सप्लोर करा मत्तय 27:45
6
मत्तय 27:22-23
“मग ख्रिस्त जो येशू यांचे मी काय करावे?” पिलाताने विचारले. “त्याला क्रूसावर खिळा,” लोक मोठ्याने ओरडले. “पण का?” पिलाताने खुलासा विचारला, “त्याने असा कोणता गुन्हा केला आहे?” पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला क्रूसावर खिळा!”
एक्सप्लोर करा मत्तय 27:22-23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ