१ करिंथ 5
5
भयंकर स्वरूपाच्या अनीतीचे एक उदाहरण
1मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही; म्हणजे तुमच्यातील कोणीएकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे.
2तरीही तुम्ही फुगला आहात! आणि हे कर्म करणारा आपणांतून घालवून देण्याइतका शोक तुम्ही केला नाही.
3मी शरीराने गैरहजर असलो तरी आत्म्याने हजर आहे आणि हजर असल्यासारखा मी तर निर्णय करून चुकलो आहे.
4,5तो असा की, ज्याने अशा प्रकारे हे कर्म केले त्या माणसाला तुम्ही व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा ह्यांनी एकत्र मिळून आपला प्रभू येशू ह्याच्या नावाने देहस्वभावाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावे, अशा हेतूने की, आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारलाजावा.
6तुमचे हे आढ्यता बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?
7तर जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की, तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे, कारण आपला वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले.
8म्हणून आपण सण पाळावा तो जुन्या खमिराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा ह्यांच्या खमिराने नव्हे, तर सात्त्विकपणा व खरेपणा ह्या बेखमीर भाकरींनी तो पाळावा.
9तुम्ही जारकर्म्यांची संगत धरू नये, असे मी आपल्या पत्रात तुम्हांला लिहिले होते;
10तथापि ह्या जगाचे जारकर्मी, लोभी, वित्त हरण करणारे1 व मूर्तिपूजक ह्यांची संगत मुळीच धरू नये असे माझे म्हणणे नाही; कारण तसे कराल तर तुम्हांला जगातून निघून जावे लागेल.
11म्हणून मी तुम्हांला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की, बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा1 असला तर तशाची संगत धरू नये; त्याच्या पंक्तीसही बसू नये.
12कारण जे बाहेर आहेत त्यांचा न्याय करणे माझ्याकडे कोठे आहे? जे आत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करत नाही काय?
13जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.”
सध्या निवडलेले:
१ करिंथ 5: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: