२ करिंथ 2
2
1मी आपल्या मनात निश्चय केला होता की, दु:ख देण्यास तुमच्याकडे पुन्हा येऊ नये.
2कारण जर मी तुम्हांला दु:ख देऊ लागलो तर माझ्यापासून ज्याला दु:ख होते त्याच्याशिवाय मला आनंद देणारा कोण आहे?
3तुम्हांला मी हेच लिहिले होते, ह्यासाठी की, मी आल्यावर, ज्यांच्यापासून मला आनंद व्हायचा त्यांच्यापासून मला दु:ख होऊ नये; मला तुम्हा सर्वांविषयी असा भरवसा आहे की माझा आनंद तो तुम्हा सर्वांचा आनंद आहे.
4मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रू गाळत तुम्हांला लिहिले होते; तुम्ही दु:खी व्हावे म्हणून नव्हे, तर तुमच्यावर माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्हांला कळून यावी म्हणून लिहिले.
पश्चात्ताप केलेल्यास क्षमा करणे
5कोणी दु:ख दिले असेल तर त्याने ते मलाच नाही, तर काही अंशी — फार कडक भाषेत सांगायचे नसेल तर — तुम्हा सर्वांना दिले.
6अशा मनुष्याला बहुमताने दिली ती शिक्षा पुरे.
7म्हणून तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे. नाहीतर तो दु:खसागरात बुडून जायचा.
8म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खातरी करून द्या.
9हे मी जे लिहिले त्यात माझा आणखी एक हेतू होता तो असा की, तुम्ही सर्व बाबतींत आज्ञापालन करता की नाही ह्याचे मला प्रमाण पटावे.
10ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करता त्याला त्याबाबत मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुमच्याकरता ख्रिस्तासमक्ष केली आहे;
11अशा हेतूने की, आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये; त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.
शुभवृत्तामुळे उद्भवणारी संकटे व जयोत्सवाचे प्रसंग
12असो; मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोवसास आल्यावर माझ्यासाठी प्रभूच्या ठायी दार उघडले;
13तेव्हा माझा बंधू तीत हा मला भेटला नाही, म्हणून माझ्या जिवाला चैन पडेना. मग तेथील लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियात निघून गेलो.
14जो देव आम्हांला सर्वदा ख्रिस्ताच्या ठायी जयोत्सवाने नेतो, आणि सर्व ठिकाणी आमच्या द्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रकट करतो, त्याची स्तुती असो.
15तारणप्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहोत;
16एकाला मृत्यूचा मरणसूचक गंध, आणि एकाला जीवनाचा जीवनसूचक गंध आहोत. हे कार्य करण्यास कोण लायक आहे?
17पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्त्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत.
सध्या निवडलेले:
२ करिंथ 2: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: