तेव्हा विश्वास धरणार्यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्वकाही समाईक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते; आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनींचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ती विकत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवत; मग ज्याच्या-त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्णबा (म्हणजे बोधपुत्र) म्हणत. त्याची शेतजमीन होती; ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणी ठेवले.
प्रेषितांची कृत्ये 4 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 4:32-37
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ