YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 18:15-19

अनुवाद 18:15-19 MARVBSI

तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊबंदांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरता उभा करील, त्याचे तुम्ही ऐका; होरेब डोंगराजवळ मंडळी जमली होती त्या दिवशी आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे तू विनंती केली होतीस त्याप्रमाणे होईल; तू म्हणालास, ‘माझा देव परमेश्वर ह्याची वाणी पुन्हा माझ्या कानी न पडो, मोठा अग्नी पुन्हा माझ्या दृष्टीस न पडो, पडला तर मी मरेन.’ तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘हे लोक म्हणतात ते ठीक आहे. मी त्यांच्यासाठी त्यांच्या भाऊबंदांतून तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन; त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करील. तो माझ्या नावाने बोलेल ती वचने जो कोणी ऐकणार नाही त्याला मी जाब विचारीन.