YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उपदेशक 1

1
सर्वकाही व्यर्थ
1यरुशलेमेतील राजा दावीदपुत्र, उपदेशक1 ह्याची वचने :
2व्यर्थ हो व्यर्थ! असे उपदेशक म्हणतो; व्यर्थ हो व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ.
3ह्या भूतलावर2 मनुष्य जे सर्व परिश्रम करतो त्यांत त्याला काय लाभ?
4एक पिढी जाते व दुसरी येते; पृथ्वीच काय ती सदा कायम राहते.
5सूर्य उदय पावून अस्तास जातो आणि तेथून आपल्या उदयस्थानाकडे धाव घेतो.
6वायू दक्षिण दिशेकडे वाहतो व उलटून उत्तर दिशेकडे वाहतो; तो एकसारखा घुमत जाऊन पुनःपुन्हा आपली फेरी करतो.
7सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात तरी सागर भरून जात नाही; ज्या स्थली त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुनःपुन्हा वाहत राहतात.
8सर्वकाही कष्टमय आहे; कोणालाही त्याचे वर्णन करता येत नाही; ते पाहून डोळ्यांची तृप्ती होत नाही, ऐकून कानाचे समाधान होत नाही.
9एकदा होऊन गेले तेच होणार; करण्यात आले तेच करण्यात येणार; भूतलावर नवे म्हणून काहीच नाही;
10“हे पाहा, काही नवीन आहे,” असे एखाद्या गोष्टीविषयी कोणी म्हटल्यास ती आपल्यापूर्वी युगांतरी होऊन गेलेली असते.
11मागील गोष्टींचे स्मरण राहिले नाही; पुढे जे होतील त्यांचेही स्मरण त्यांच्या पुढच्यांना राहणार नाही.
उपदेशकाचा अनुभव
12मी, उपदेशक, यरुशलेमात इस्राएलांचा राजा होतो.
13ह्या भूतलावर जे काही व्यापार चाललेले असतात त्यांचा नीट शोध करून ज्ञानाच्या योगाने त्यांचे रहस्य पाहण्याकडे मी आपले चित्त लावले. देवाने मानवपुत्रांच्या मागे बिकट कष्ट लावून दिले आहेत.
14ह्या भूतलावर जी काही कामे चालत असतात ती मी पाहिली; आणि पाहा, हा सर्व व्यर्थ, वायफळ उद्योग होय.
15जे वाकडे आहे ते सरळ होत नाही; जे उणे आहे ते जमेस धरता येत नाही.
16मी आपल्या मनाशी म्हणालो, “माझ्यापूर्वी जितके राजे यरुशलेमेवर होऊन गेले तितक्यांहून अधिक ज्ञान मी प्राप्त करून घेतले आहे; ज्ञान व विद्या ह्यांची पूर्ण प्रतीती माझ्या मनाला घडली आहे.”
17ज्ञान काय आणि वेडेपण व मूर्खपण ही काय हे जाणण्याकडे मी आपले चित्त लावले, तेव्हा मला असे दिसून आले की, हाही वायफळ उद्योग होय.
18कारण जेथे ज्ञान फार तेथे खेदही फार; ज्याला विद्या अधिक त्याला दु:खही अधिक.

सध्या निवडलेले:

उपदेशक 1: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन