उपदेशक 7
7
ज्ञानाची श्रेष्ठता
1सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा.
2भोजनोत्सवगृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे; कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे; जिवंताच्या मनात ही गोष्ट बिंबून राहील.
3हसण्यापेक्षा खेद करणे बरे; मुद्रा खिन्न असल्याने मन सुधारते.
4शहाण्यांचे चित्त शोकगृहाकडे लागते; पण मूर्खांचे चित्त हास्यविनोदगृहाकडे लागते.
5मूर्खांचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेधवाणी ऐकणे बरे.
6कारण मूर्खाचे हास्य हंड्याखाली जळणार्या काट्याकुट्यांच्या कडकडण्यासारखे असते; हेही व्यर्थ होय.
7जुलूम केल्याने शहाणा वेडा बनतो; लाच खाल्ल्याने बुद्धीला भ्रंश होतो.
8एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा; उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम बरा.
9मन उतावळे होऊ देऊन रागावू नकोस; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो.
10“ह्या दिवसांपेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का?” असे म्हणू नकोस; हे तुझे विचारणे शहाणपणाचे नव्हे.
11वतनाबरोबर शहाणपण असल्यास बरे; भूतलावर जन्म पावलेल्यांना1 ते विशेष हितावह आहे.
12ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणारा आहे; तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्याजवळ शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करते.
13देवाची करणी पाहा; त्याने जे वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल?
14संपत्काली आनंद कर; विपत्काली विवेकाने वाग; कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्याला कळू नये म्हणून देवाने सुखदुःखे शेजारी-शेजारी ठेवली आहेत.
15एखादा नीतिमान मनुष्य नीतीचे र्आचरण करीत असतो तरी तो नष्ट होतो; आणि एखादा दुष्ट मनुष्य अनीतीचे आचरण करीत असताही दिर्घायू होतो; हे सर्व मी आपल्या व्यर्थ गेलेल्या दिवसांत पाहिले आहे.
16फाजील नीतिमान होऊ नकोस; मर्यादेबाहेर शहाणपणा मिरवू नकोस; तू आपला नाश का करून घ्यावास?
17दुष्टतेचा अतिरेक करू नकोस; मूर्ख होऊ नकोस; तू अकाली का मरावे?
18ह्याला तू धरून राहावे, आणि त्यापासून तू आपला हात मागे घेऊ नये हे बरे; कारण जो देवाचे भय धरतो तो ह्या सर्वांतून पार पडेल.
19नगरातल्या दहा अधिपतींपेक्षा शहाणपण शहाण्याचे अधिक चांगले रक्षण करते.
20सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा नीतिमान पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.
21बोललेल्या सर्व शब्दांकडे लक्ष देऊ नकोस, देशील तर कदाचित तुझा चाकर तुला शिव्याशाप देताना ऐकशील;
22कारण तूही इतरांना वारंवार शिव्याशाप दिलेस हे तुझ्या मनास ठाऊक आहे.
ज्ञानाचा शोध
23मी ह्या सर्व गोष्टी विवेकाने अजमावून पाहिल्या आहेत; “आपण ज्ञानसंपन्न व्हावे,” असे मी म्हणालो, पण ते माझ्यापासून दूरच राहिले.
24जे आहे ते दूर व अत्यंत गूढ आहे; त्याचा थांग कोणाला लागणार?
25ज्ञान व विवेक ही समजून घेऊन त्यांचे रहस्य जाणावे व त्यांचा शोध लावावा, आणि दुष्टता केवळ मूर्खत्व आहे व मूर्खत्व केवळ वेडगळपणा आहे, हे समजावे म्हणून मी फिरून आपले चित्त ह्या गोष्टींकडे लावले.
26मला मृत्यूहूनही दु:खदायी अशी एक वस्तू आढळली, ती पाशरूप झालेली स्त्री होय; तिचे हृदय केवळ पारध्याचे जाळे आहे; तिचे हात शृंखला आहेत; जो पुरुष देवाला प्रिय असतो तोच तिच्या हातून सुटतो; पापी तिच्या तावडीत सापडतो.
27उपदेशक1 म्हणतो, हिशोब पाहावा म्हणून एकंदर गोळाबेरीज करता मला आढळून आले ते हे :
28पण मी आजवर धुंडाळत आहे तरी मला आढळले नाही ते हे : हजारांत एक पुरुष मला आढळला, पण तेवढ्या स्त्रियांत मला एकही स्त्री आढळली नाही.
29पाहा, एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे.
सध्या निवडलेले:
उपदेशक 7: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: