YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 24

24
परमेश्वराने केलेल्या कराराची पुनःस्थापना
1मग तो मोशेला म्हणाला, “तू, अहरोन नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलांपैकी सत्तर जण असे मिळून परमेश्वराकडे वर चढून येऊन त्याला दुरून नमन करा.
2एकट्या मोशेने मात्र परमेश्वरासमीप यावे; बाकीच्यांनी जवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर त्याच्याबरोबर चढून वर येऊही नये.”
3मग मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि नियम लोकांना सांगितले, तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की, “जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सर्वांप्रमाणे आम्ही करू.”
4मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली. अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी त्याने एक वेदी बांधली, आणि इस्राएलाच्या बारा वंशांप्रमाणे बारा स्तंभ उभारले.
5त्याने इस्राएल लोकांपैकी काही तरुणांना पाठवले, आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलांची शांत्यर्पणे अर्पण केली.
6मोशेने अर्धे रक्त घेऊन कटोर्‍यात ठेवले आणि अर्धे वेदीवर शिंपडले.
7मग त्याने कराराचा ग्रंथ घेऊन लोकांना वाचून दाखवला; ते ऐकून ते म्हणाले, “जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू.”
8नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकले, आणि म्हटले, “पाहा, परमेश्वराने ह्या सर्व वचनांप्रमाणे तुमच्याशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय.”
9मग मोशे, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलांपैकी सत्तर जण वर चढून गेले.
10त्यांनी इस्राएलाच्या देवाला पाहिले; त्याच्या पायांखाली नीलकांत मण्यांच्या चबुतर्‍यासारखे काही होते आणि ते अगदी आकाशासारखे स्वच्छ होते.
11पण इस्राएल लोकांच्या सरदारांवर त्याने हात उगारला नाही; त्यांना देवाचे दर्शन झाले आणि त्यांनी खाणेपिणे केले. सीनाय पर्वतावर मोशे 12मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वत चढून माझ्याकडे ये व येथे राहा; मी तुला दगडी पाट्या आणि लोकांच्या शिक्षणाकरता मी लिहिलेले नियम व आज्ञा देतो.”
13तेव्हा मोशे व त्याचा सेवक यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर गेला.
14मोशे वडिलांना म्हणाला, “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत तुम्ही येथेच आमची वाट पाहत राहा; पाहा, अहरोन व हूर हे तुमच्याबरोबर आहेत; कोणाचे काही प्रकरण असले तर ते त्याने त्यांच्याकडे न्यावे.”
15मोशे पर्वतावर गेल्यावर मेघाने पर्वत झाकून टाकला.
16परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर राहिले आणि मेघाने सहा दिवस तो झाकून टाकला आणि सातव्या दिवशी मेघातून परमेश्वराने मोशेला हाक मारली.
17पर्वताच्या माथ्यावर परमेश्वराचे तेज भस्म करणार्‍या अग्नीसारखे इस्राएल लोकांना दिसत होते.
18मोशे मेघात प्रवेश करून पर्वतावर चढला; मोशे पर्वतावर चाळीस दिवस व चाळीस रात्री होता.

सध्या निवडलेले:

निर्गम 24: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन