निर्गम 30
30
धूपवेदी
(निर्ग. 37:25-28)
1धूप जाळण्यासाठी एक वेदी कर; ती बाभळीच्या लाकडाची असावी.
2तिची लांबी एक हात व रुंदी एक हात अशी ती चौरस असावी; आणि तिची उंची दोन हात असून तिची शिंगे अंगचीच असावीत.
3त्या वेदीचा वरचा भाग व तिच्या चार्ही बाजू आणि तिची शिंगे अशी ती सगळी शुद्ध सोन्याने मढवावी व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा करावा.
4वेदी उचलून नेण्याचे दांडे घालता येण्यासाठी सोन्याच्या कड्या करून त्या कंगोर्याखाली तिच्या दोन्ही अंगांना दोन कोनांस दोन-दोन अशा लावाव्यात.
5दांडे बाभळीच्या लाकडाचे करून ते सोन्याने मढवावेत.
6साक्षपटाच्या कोशाजवळ असलेल्या अंतरपटासमोर, अर्थात साक्षपटावरील ज्या दयासनी मी तुला भेट देत जाईन त्यासमोर ही वेदी ठेवावी.
7ह्या वेदीवर अहरोनाने सुगंधी द्रव्ययुक्त धूप जाळावा; रोज सकाळी तो तेलवात करील तेव्हा हा धूप त्याने जाळावा.
8तसाच संध्याकाळी तो दिवे लावील तेव्हा त्याने धूप जाळावा; हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळत जावा.
9तिच्यावर निराळा धूप, होमार्पणे, अन्नार्पणे, अथवा कोणत्याही प्रकारचे पेयार्पण अर्पायचे नाही.
10अहरोनाने वर्षातून एकदा तिच्या शिंगासाठी1 प्रायश्चित्त करावे; पिढ्यानपिढ्या वर्षातून एकदा प्रायश्चित्ता-साठी अर्पण केलेल्या पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्चित्त करावे; ही वेदी परमेश्वराप्रीत्यर्थ परमपवित्र होय. जिवाच्या खंडणीसाठी द्यायचा पैसा
11मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
12“तू इस्राएल लोकांची खानेसुमारी करशील तेव्हा गणनेसमयी आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यांतल्या प्रत्येकाने त्या वेळी आपल्या जिवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा.
13जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल द्यावा (शेकेल म्हणजे वीस गेरे); हा अर्धा शेकेल परमेश्वराप्रीत्यर्थ केलेले समर्पण होय.
14वीस वर्षांच्या व त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये ज्यांची गणना होईल त्यांतील प्रत्येकाने परमेश्वराप्रीत्यर्थ हे समर्पण करावे.
15तुम्ही आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वरा-प्रीत्यर्थ हे समर्पण कराल तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलाहून अधिक देऊ नये आणि गरिबाने त्याहून कमी देऊ नये.
16इस्राएल लोकांपासून प्रायश्चित्ताचा पैसा घेऊन दर्शनमंडपातील सेवेला लावावा आणि हा पैसा इस्राएल लोकांच्या जिवाबद्दल प्रायश्चित्त दिल्याचे स्मारक म्हणून त्यांच्याप्रीत्यर्थ परमेश्वरासमोर राहील.”
गंगाळ
17मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
18“धुण्यासाठी तू पितळेचे एक गंगाळ बनवावे; त्याला पितळेची बैठक करावी; ते दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान ठेवून त्यात पाणी भरावे.
19त्यात अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हातपाय धुवावेत;
20ते दर्शनमंडपात जातात आणि वेदीजवळ सेवा करण्यासाठी म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य जाळण्यासाठी जातात त्या वेळी त्यांनी आपले हातपाय पाण्याने धुवावेत, नाहीतर ते मरतील.
21अहरोन व त्याचे वंशज ह्यांच्यासाठी हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी व्हावा.”
अभिषेकाचे तेल आणि धूपद्रव्य
22मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
23“तू उत्तम प्रकारचे मसाले घे, म्हणजे पवित्रस्थानातल्या चलनाप्रमाणे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस, त्याच्या निम्मे म्हणजे अडीचशे शेकेल सुगंधी दालचिनी, अडीचशे शेकेल सुगंधी बच,
24पाचशे शेकेल तज, आणि एक हिनभर जैतुनाचे तेल हे सर्व घेऊन,
25त्यांचे अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्यांच्या कसबाप्रमाणे मिसळलेले सुगंधी तेल तयार कर; हे अभिषेकाचे पवित्र तेल होय.
26ह्या तेलाने दर्शनमंडप व साक्षीचा कोश,
27मेज व त्यावरील सर्व सामान, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी,
28होमवेदी, तिचे सर्व सामान व बैठकीसह गंगाळ ह्यांना अभिषेक करावा.
29त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमपवित्र ठरतील; त्यांचा स्पर्श ज्यांना होईल ते पवित्र होतील.
30आणि याजक ह्या नात्याने माझी सेवा करण्यासाठी अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना अभिषेक करून पवित्र कर.
31इस्राएल लोकांना सांग की, पिढ्यानपिढ्या तुम्हांला माझ्याप्रीत्यर्थ हेच पवित्र अभिषेकाचे तेल असणार.
32हे तेल कोणाही व्यक्तीच्या अंगाला लावायचे नाही व ह्या प्रकारचे मिश्रण कोणी करायचे नाही; हे पवित्र आहे; आणि तुम्ही ह्याला पवित्रच लेखावे.
33जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा कोणा परक्याला ते लावील त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”
34आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू सुगंधी मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधाबिरुजा व शुद्ध ऊद, ही सर्व समभाग घ्यावीस.
35आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून निर्भेळ शुद्ध आणि पवित्र असे धूपद्रव्य तयार करावेस;
36त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे आणि ते थोडेसे घेऊन दर्शनमंडपातील ज्या कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन त्यात ठेवावे; ते तुम्ही परमपवित्र लेखावे.
37जे धूपद्रव्य तू तयार करशील त्यासारखे मिश्रण तुम्ही आपल्या स्वतःसाठी तयार करू नये; हे परमेश्वराप्रीत्यर्थ तुम्ही पवित्र लेखावे.
38कोणी वास घेण्याकरता असले काही तयार करील तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”
सध्या निवडलेले:
निर्गम 30: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: