निर्गम 34
34
दगडाच्या नव्या पाट्या
(अनु. 10:1-5)
1परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडवून तयार कर म्हणजे तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्यांच्यावर लिहीन.
2तू पहाटेस तयार हो आणि सकाळी सीनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वतशिखरावर माझ्यासमोर हजर हो.
3तुझ्याबरोबर कोणीही वर चढून येऊ नये, सगळ्या पर्वतावर कोणी मनुष्य दिसता कामा नये, तसेच शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांना त्या पर्वताच्या कडेला चरू देऊ नये.”
4तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडल्या आणि सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सीनाय पर्वतावर चढून गेला.
5तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला व तेथे त्याच्याजवळ उभा राहिला, आणि त्याने ‘परमेश्वर’ ह्या नावाची घोषणा केली.
6परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली : “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, 7हजारो जणांवर1 दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा, (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसर्या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.”
8तेव्हा मोशेने त्वरा करून भूमीपर्यंत लवून नमन केले;
9आणि तो म्हणाला, “हे प्रभू, तुझी माझ्यावर आता कृपादृष्टी झाली असेल तर प्रभूने आमच्याबरोबर चालावे; हे लोक ताठ मानेचे आहेत; तरी आमचा अन्याय व पाप ह्यांची क्षमा कर व आम्हांला आपले वतन समजून आमचा अंगीकार कर.”
पुन्हा करार करणे
(निर्ग. 23:14,19; अनु. 7:1-5; 16:1-17)
10परमेश्वर म्हणाला, “पाहा, मी एक करार करतो; तुझ्या सर्व लोकांदेखत मी अशी अद्भुत कृत्ये करीन की तशी सर्व पृथ्वीभर कोणत्याही राष्ट्रात झाली नाहीत; ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सगळे परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे.
11मी तुला आज्ञा देऊन सांगतो, ते तू पाळ; मी तुझ्यासमोरून अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्या लोकांना घालवून देतो.
12तू सावध राहा, नाहीतर तू जात आहेस त्या देशातल्या रहिवाशांशी करारमदार करशील आणि तो तुला पाश होईल.
13त्यांच्या वेद्या पाडून टाका; त्यांचे स्तंभ फोडून टाका, आणि त्यांच्या अशेरा मूर्तींचा2 भंग करा;
14कारण तुला दुसर्या कोणत्याही देवाला नमन करायचे नाही; कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान आहे, तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे;
15तू सावध राहा. देशातील रहिवाशांशी तुला करारमदार करायचा नाही; नाहीतर ते व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे लागून त्यांना बलिदान करतील, आणि त्यांच्यातल्या कोणी तुला बोलावले असता तू त्यांच्या बलिदानातले काही खाशील;
16त्यांच्या मुलींपैकी कोणी तू आपल्या मुलांकरता बायका करून घेशील, आणि त्यांच्या मुली व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे जातील आणि तुझ्या मुलांना व्यभिचारी बुद्धीने त्यांच्या नादी लावतील.
17तू आपल्यासाठी ओतीव देव करू नकोस.
18बेखमीर भाकरीचा सण पाळ. माझ्या आज्ञेला अनुसरून अबीब महिन्याच्या नेमलेल्या समयी सात दिवसपर्यंत तू बेखमीर भाकर खावी, कारण अबीब महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास.
19प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे; तुझ्या गुराढोरांपैकी गाईंचे व मेंढरांचे प्रत्येक प्रथमनरवत्स माझे आहेत.
20गाढवीचे पहिले शिंगरू खंडणीदाखल एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे; त्याला तसे सोडवले नाही, तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांपैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडवून घ्यावे. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.
21सहा दिवस तू आपले कामकाज कर, पण सातव्या दिवशी विसावा घे; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही विसावा घे.
22तू सप्ताहाचा सण म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथमपिकाचा सण पाळावास.
23वर्षातून तीनदा तुझ्या सर्व पुरुषांनी इस्राएलाचा देव प्रभू परमेश्वर ह्याच्यासमोर हजर व्हावे.
24मी तर परराष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देईन व तुझी सरहद्द वाढवीन; वर्षातून तीनदा तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर हजर होण्यास जाशील तेव्हा कोणी तुझ्या भूमीचा लोभ धरणार नाही.
25माझ्या यज्ञपशूचे रक्त खमिराच्या भाकरीबरोबर अर्पू नये. वल्हांडण सणातल्या यज्ञपशूचे काहीएक सकाळपर्यंत राहू देऊ नये.
26आपल्या जमिनीच्या प्रथमउत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.”
27मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “ही वचने लिहून ठेव, कारण ह्याच वचनाप्रमाणे मी तुझ्याशी व इस्राएल लोकांशी करार केला आहे.”
28मोशे तेथे परमेश्वराबरोबर चाळीस दिवस व चाळीस रात्री होता; त्याने भाकर खाल्ली नाही, तो पाणीही प्यायला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे दहा वचने लिहून ठेवली.
मोशे पर्वतावरून खाली येतो
29मग मोशे सीनाय पर्वतावरून उतरला; आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हातात घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहर्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते.
30मोशेच्या चेहर्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्राएल लोकांनी पाहिले तेव्हा ते त्याच्याजवळ जायला भ्याले.
31मग मोशेने अहरोन व मंडळीचे प्रमुख ह्यांना बोलावले; तेव्हा अहरोन व मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले, आणि तो त्यांच्याशी संभाषण करू लागला.
32नंतर सर्व इस्राएल लोक जवळ आले आणि जे काही सीनाय पर्वतावर परमेश्वराने त्याला सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले.
33मोशेने त्यांच्याशी बोलणे संपवल्यावर आपल्या तोंडावर आच्छादन घातले;
34पण मोशे परमेश्वराशी संभाषण करायला त्याच्यासमोर आत जाई तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या तोंडावरचे आच्छादन काढत असे; मग जी काही आज्ञा त्याला होई ती तो बाहेर येऊन इस्राएल लोकांना सांगत असे.
35इस्राएल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहत तेव्हा त्याच्या चेहर्यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत; परमेश्वराशी संभाषण करण्यास मोशे आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर आच्छादन घालत असे.
सध्या निवडलेले:
निर्गम 34: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: