यहेज्केल 10
10
देवाचे तेज मंदिरातून निघून जाते
1मी पाहिले तेव्हा करूबांवरल्या छतांवर नीलमण्यासारखे काही दिसले, ते सिंहासनाच्या प्रतिमेसारखे होते.
2मग परमेश्वर तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्याला म्हणाला, “करूबांखाली चाकांच्या मध्ये जाऊन करूबांच्या मधून इंगळांनी आपली ओंजळ भर व ते नगरावर विखर.” तेव्हा तो माझ्यादेखत गेला.
3तो मनुष्य गेला तेव्हा करूब मंदिराच्या उजवीकडे उभे होते आणि आतले अंगण मेघाने व्यापून टाकले होते.
4परमेश्वराचे तेज करूबांवरून निघून मंदिराच्या उंबरठ्यावर आले होते; मंदिर मेघाने व्यापले होते व अंगण परमेश्वराच्या तेजाच्या प्रभेने भरून गेले होते.
5करूबांच्या पंखांचा ध्वनी बाहेरच्या अंगणात ऐकू जात होता; सर्वसमर्थ देवाच्या वाणीसारखा तो होता.
6त्याने शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेल्या मनुष्याला आज्ञा देऊन सांगितले की, “त्या चाकांमधून, करूबांच्या मधून, इंगळ घे;” तेव्हा तो जाऊन चाकाच्या बाजूला उभा राहिला.
7मग त्या करूबांमधल्या एकाने आपला हात लांबवून करूबांमधल्या विस्तवास तो लावला; त्याने त्यातून काही इंगळ घेऊन तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्याच्या हातात दिले; तो ते घेऊन निघून गेला.
8तेथे करूबांजवळ त्यांच्या पंखांखाली मनुष्याच्या हाताच्या आकृतीसारखे काही दृष्टीस पडले.
9मी पाहिले तर प्रत्येक करूबाच्या बाजूस एक अशी सगळ्या करूबांच्या बाजूला चार चाके होती; ती चाके वैडूर्यमण्यांसारखी दिसत होती.
10दिसायला त्या चार चाकांचा डौल सारखा होता; ती जशी काय चाकाआड चाक अशी होती.
11ते चालत तेव्हा चार्ही दिशांपैकी पाहिजे त्या दिशेला जात; चालताना वळत नसत; प्रत्येक मस्तकाच्या कोणत्याही रोखाने ते जात; चालताना वळत नसत.
12त्यांचे सर्व शरीर, पाठ, हात, पंख व चार चाके ह्यांना सर्वत्र डोळे होते.
13चाकांना गरगर फिरणारी चाके असे म्हटलेले मी ऐकले.
14त्या प्रत्येकाला चार मुखे होती; पहिले मुख करूबाच्या मुखासारखे होते, दुसरे मनुष्याच्या मुखासारखे होते, तिसरे सिंहाच्या मुखासारखे होते व चौथे गरुडाच्या मुखासारखे होते.
15ते करूब उडून वर गेले; मी खबार नदीच्या तीरी पाहिला तो हा प्राणी होय.
16करूब चालले म्हणजे चाके त्यांच्याबरोबर चालत आणि भूमीवरून उंच उडण्यासाठी ते आपले पंख उचलत तेव्हा ती चाके वेगळी होत नसत.
17ते थांबले म्हणजे ती थांबत, ते वर उडाले म्हणजे त्यांच्याबरोबर ती वर जात; कारण त्या प्राण्यांचा आत्मा त्यांत होता.
18तेव्हा परमेश्वराचे तेज मंदिराच्या उंबरठ्यावरून निघून करूबांवर जाऊन राहिले.
19निघतेवेळी करूबांनी आपले पंख उचलले व ते माझ्यादेखत भूमीवरून वर चढून गेले; त्यांच्याबरोबर चाकेही गेली; ते परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्वद्वारापुढे थांबले; त्यांच्यावर इस्राएलाच्या देवाचे तेज होते.
20खबार नदीच्या तीरी मी इस्राएलाच्या देवाच्या आसनाखाली पाहिला होता तो हा प्राणी होय; ते करूब आहेत हे मला कळले.
21त्या प्रत्येकाला चार मुखे होती व प्रत्येकाला चार पंख होते; त्यांच्या पंखांखाली मनुष्याच्या हातासारखी आकृती होती.
22त्यांच्या चेहर्यांविषयी म्हणाल, तर खबार नदीच्या तीरी मी पाहिलेल्या चेहर्यांसारखेच ते होते; त्यांची स्वरूपे व ते स्वतः तसेच होते; ते नीट आपल्यासमोर चालत.
सध्या निवडलेले:
यहेज्केल 10: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: