यहेज्केल 15
15
यरुशलेम जणू निरुपयोगी द्राक्षलता
1परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“मानवपुत्रा, सर्व वृक्षांत द्राक्षलतेची काय श्रेष्ठता आहे? वनवृक्षांमध्ये जी द्राक्षांची फांदी होती ती काय अधिक आहे?
3तिचे लाकूड कोणी कामास लावतो काय? भांडी टांगून ठेवण्यासाठी तिच्या खुंट्या बनवतात काय?
4पाहा, ती अग्नीत सरपण म्हणून टाकतात; अग्नीने तिची दोन्ही टोके जाळली व मधला भाग भस्म झाला तर ती कोणत्या कामास येईल?
5पाहा, ती शाबूत असता कसल्याही कामी पडत नाही, तर मग अग्नीने जळून तिचा कोळसा झाल्यावर ती कोणत्या कामी पडणार?
6ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, मी वनवृक्षांतील द्राक्षलता अग्नीत सरपण म्हणून टाकतो त्याप्रमाणे यरुशलेमनिवाशांना अग्नीत टाकीन.
7मी त्यांना विमुख होईन, ते अग्नीतून बाहेर पडले तरी अग्नी त्यांना खाऊन टाकील; मी त्यांना विमुख होईन, तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
8त्यांनी विश्वासघात केला आहे म्हणून मी देश वैराण करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
सध्या निवडलेले:
यहेज्केल 15: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: