यहेज्केल 2
2
यहेज्केलाला पाचारण
1तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू आपल्या पायांवर उभा राहा, म्हणजे मी तुझ्याबरोबर बोलेन.”
2तो माझ्याबरोबर बोलत असता आत्म्याने माझ्या ठायी प्रवेश करून मला माझ्या पायांवर उभे केले; तेव्हा त्याचे बोलणे मला ऐकू आले.
3तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, मी तुला इस्राएल वंशजांकडे, माझ्याशी फितुरी केलेल्या त्या फितूर राष्ट्राकडे पाठवतो. त्यांनी व त्यांच्या वाडवडिलांनी आजपर्यंत माझ्याविरुद्ध वर्तन केले आहे.
4हे त्यांचे वंशज उद्धट व कठीण हृदयाचे आहेत; मी तुला त्यांच्याकडे पाठवत आहे. ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो’ हे त्यांना सांग.
5ते तुझे ऐकोत न ऐकोत, निदान त्यांच्याकडे कोणीतरी संदेष्टा गेला होता ते त्यांना समजेल; ती तर बोलूनचालून फितुरी जात आहे.
6हे मानवपुत्रा, तुझ्याभोवती काटेझुडपे व काटे असले, तू विंचवांमध्ये असलास तरी त्यांना भिऊ नकोस, त्यांच्या शब्दांना भिऊ नकोस; ही फितुरी जात आहे तरी त्यांच्या शब्दांना भिऊ नकोस; त्यांच्या चर्येस भिऊ नकोस.
7ते ऐकोत न ऐकोत, तू माझी वचने त्यांना साग; ते तर अत्यंत फितुरी आहेत.
8हे मानवपुत्रा, मी सांगतो ते ऐक; त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितूर होऊ नकोस; आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा.”
9मी पाहिले तेव्हा माझ्याकडे एक हात पुढे झाला; आणि पाहा, त्या हातात ग्रंथाचा पट होता;
10तो त्याने माझ्यापुढे पसरला; त्यावर पाठपोट लिहिले होते आणि त्यात विलाप, शोक व आकांत ह्यांविषयीचा लेख होता.
सध्या निवडलेले:
यहेज्केल 2: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: