यहेज्केल 26
26
सोरेविषयी भविष्य
1नंतर अकराव्या वर्षी महिन्याच्या प्रतिपदेस, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे :
2“मानवपुत्रा, सोर यरुशलेमेविषयी म्हणत आहे, ‘अहा! जी केवळ राष्ट्रांचे प्रवेशद्वार अशी होती ती मोडून गेली आहे आणि आता लोकप्रवाह माझ्याकडे वळला आहे; ती उजाड झाली आहे, म्हणून आता माझी भरभराट होणार आहे;’
3ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, अगे सोरे, मी तुझ्याविरुद्ध आहे, समुद्र आपल्या लाटा लोटतो त्याप्रमाणे मी तुझ्यावर बहुत राष्ट्रे लोटीन.
4ते सोरेच्या तटांचा विध्वंस करतील व तिचे बुरूज पाडून टाकतील; मी तिच्यावरील माती खरडून काढून तिचा उघडा खडक करीन.
5ती समुद्रात जाळी पसरण्याचे ठिकाण होईल; मी हे म्हटले आहे असे परमेश्वर म्हणतो; लूट म्हणून ती राष्ट्रांच्या हाती लागेल.
6तिच्या भूप्रदेशात असलेल्या तिच्या कन्या तलवारीने ठार होतील; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
7कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी बाबेलचा राजा, राजाधिराज नबुखद्रेस्सर, ह्याला उत्तरेहून घोडे, रथ, स्वार व मोठे दळ ह्यांसह सोरेवर आणीन.
8भूप्रदेशातल्या तुझ्या कन्यांना तो तलवारीने वधील; तो तुझ्याविरुद्ध बुरूज बांधील, मोर्चा रचील व तुझ्याविरुद्ध ढालींचा कोट उभारील.
9तो तुझ्या तटांना आपली आघातयंत्रे लावील, आपल्या हत्यारांनी तुझे बुरूज पाडून टाकील.
10त्याचे घोडे इतके येतील की, त्यांनी उडवलेल्या धुळीने तू झाकून जाशील; तटबंदीची नगरे फोडून आत शिरतात तसे तो तुझ्या वेशीतून आत शिरेल, तेव्हा स्वार, चाके व रथ ह्यांच्या आवाजाने तुझे तट हादरतील.
11तो आपल्या घोड्यांच्या टापांनी तुझे सर्व रस्ते तुडवील; तो तुझे लोक तलवारीने ठार मारील, तुझे मजबूत स्तंभ जमीनदोस्त होतील.
12ते तुझी संपत्ती लुटतील, तुझा माल लुटतील; तुझे तट उद्ध्वस्त करतील, तुझे रंगमहाल पाडून टाकतील; तुझे पाषाण, लाकूड, माती वगैरे सर्वकाही पाण्यात बुडवून टाकतील.
13मी तुझ्या गीतांचा ध्वनी बंद पाडीन, तुझ्या वीणांचा सूर पुन्हा ऐकू येणार नाही.
14मी तुझा उघडा खडक करून तुला जाळे पसरण्याचे ठिकाण करीन; तुला पुन्हा बांधणार नाहीत; मी परमेश्वराने हे म्हटले आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
15प्रभू परमेश्वर सोरेस म्हणतो, तुझ्या पतनाच्या आवाजाने, जखमी झालेल्यांच्या कण्हण्याने, तुझ्यामध्ये चाललेल्या कत्तलीने द्वीपांचा थरकाप होणार नाही का?
16तेव्हा सर्व दर्यावर्दी सरदार आपापल्या आसनांवरून उतरून खाली येतील, आपले झगे काढून ठेवतील, आपली जरतारी वस्त्रे काढून टाकतील; ते भीतिरूप वस्त्रे धारण करून जमिनीवर बसतील, क्षणोक्षणी त्यांचा थरकाप होईल व तुझ्याविषयी ते विस्मय पावतील.
17ते तुझ्याविषयी शोक करून म्हणतील, ‘अगे कीर्तिमान नगरी, तू जशी काय समुद्रातून उद्भवून बसली होतीस, तू समुद्रावर पराक्रमी होतीस, तू व तुझे रहिवासी ह्यांचा तेथील सर्व लोकांना वचक असे, ती तू कशी नष्ट झालीस!
18तुझ्या पतनदिनी द्वीपांचा थरकाप होत आहे! तुझ्या निघून जाण्याने समुद्रातील द्वीपे भयचकित झाली आहेत.’
19प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुला निर्जन झालेल्या नगरांप्रमाणे ओसाड नगरी करीन व तुझ्यावर खोल सागराचा लोट आणून प्रचंड जलप्रवाहांनी तुला व्यापून टाकीन,
20तेव्हा गर्तेत गेलेल्या प्राचीन काळच्या लोकांकडे तुला खाली टाकून गर्तेत गेलेल्यांबरोबर प्राचीन काळापासून ओसाड असलेल्या स्थानांत पृथ्वीच्या अधोभागी तुला राहायला लावीन म्हणजे तू पुन्हा वसणार नाहीस; पण मी जिवंतांच्या भूमीला वैभव देईन.
21लोकांना दहशत पडेल असा तुझा मी विध्वंस करीन, तू नाहीशी होशील; तुझा शोध करतील तरी तू कधीही सापडणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
सध्या निवडलेले:
यहेज्केल 26: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: