यहेज्केल 28
28
सोरेच्या राजाविषयी भविष्य
1परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“मानवपुत्रा, सोरेच्या अधिपतीस सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझे हृदय उन्मत्त होऊन तू म्हणतोस, ‘मी देव आहे, भर समुद्रात मी देवाच्या आसनावर बसलो आहे;’ पण तू देव नव्हेस, मानव आहेस; आपले चित्त देवाच्या चित्तासारखे आहे असा तू आव आणतोस;
3पाहा, दानिएलापेक्षा तू बुद्धिमान आहेस; कोणतीही गुप्त गोष्ट लोकांना तुझ्यापासून लपवता येत नाही;
4तू आपल्या अकलेने व चातुर्याने धन संपादन केलेस व आपल्या भांडारांत सोन्यारुप्याचा संचय केलास;
5तू आपल्या अकलेच्या जोरावर व्यापार करून आपले धन वाढवलेस; ह्या तुझ्या धनाने तुझे हृदय उन्मत्त झाले आहे.
6ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, आपले चित्त देवाच्या चित्तासारखे आहे असा तू आव आणतोस;
7म्हणून पाहा, मी तुझ्यावर परकीय लोक आणतो; तुझ्यावर अन्य राष्ट्रांतले उग्र पुरुष आणतो; तुझ्या अकलेच्या सौंदर्यावर ते तलवार उपसतील व तुझे तेज भ्रष्ट करतील.
8ते तुला गर्तेत उतरवतील; भर समुद्रात वध पावणार्यांच्या मृत्यूसारखा तुझा मृत्यू होईल.
9तू आपल्या वधणार्यासमोर ‘मी देव आहे,’ असे म्हणशील काय? घायाळ करणार्याच्या हाती सापडलास तो तू देव नव्हेस, मानव आहेस.
10बेसुंती मरतात त्याप्रमाणे तू परदेशीयांच्या हस्ते मरशील; हे माझे म्हणणे आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
सोरेच्या राजासाठी विलाप
11पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
12“मानवपुत्रा, सोरेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्राच आहेस; तू ज्ञानपूर्ण व सर्वांगसुंदर आहेस.
13देवाचा बाग एदेन ह्यात तू होतास; अलाक, पुष्कराज, हिरा, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाचू, माणिक, व सोने असे अनेक तर्हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते; खंजिर्या व बासर्या ह्यांचे कसब तुझ्या येथे चालत असे; तुला निर्माण केले त्या दिवशी त्यांची योजना झाली.
14तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास; मी तुझी तशी योजना केली होती; तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास; तू अग्नीप्रमाणे झगझगणार्या पाषाणांतून हिंडत असायचास.
15तुला निर्माण केले त्या दिवसापासून तुझ्या ठायी अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालचलणूक यथायोग्य होती.
16तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकारबुद्धी शिरून तू पातक केलेस; म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले. हे पाखर घालणार्या करूबा! त्या अग्नीप्रमाणे झगझगणार्या पाषाणांमधून काढून मी तुझा नाश केला आहे.
17तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उन्मत्त झाले, तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली; मी तुला भूमीवर आदळले, राजांनी तुझा तमाशा पाहावा म्हणून त्यांच्यापुढे तुला टाकले.
18खोटा व्यापार चालवून तू बहुत पातके केलीस, त्यांनी तू आपली पवित्रस्थाने विटाळलीस म्हणून तुझ्यातून अग्नी निघून तुला खाऊन टाकील, असे मी केले आहे आणि तुला पाहणार्यांच्या डोळ्यांदेखत मी पृथ्वीवर तुझी राखरांगोळी केली आहे.
19राष्ट्रांमध्ये तुझ्या ओळखीचे सर्व तुला पाहून विस्मय पावले आहेत, तुझी दशा पाहून लोकांना दहशत पडली आहे, तू कायमचा नष्ट झाला आहेस.”
सीदोनेविषयी भविष्य
20मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
21“मानवपुत्रा, सीदोनेकडे आपले मुख फिरवून तिच्याविरुद्ध संदेश दे;
22तिला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, हे सीदोने, मी तुझ्याविरुद्ध आहे, व तुझ्यामध्ये मी आपला प्रताप गाजवीन; मी तिला न्यायदंड करीन व तिच्यामध्ये मी पवित्र ठरेन, तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
23मी तिच्यात मरी पाठवीन, तिच्या रस्त्यावर रक्ताचा सडा घालीन; तिच्यावर चोहोकडून तलवार चालेल आणि लोक घायाळ होऊन तिच्या ठायी पडतील; तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.
24त्यानंतर इस्राएल घराण्याच्या आसपासच्या द्वेष्ट्यांपैकी कोणी त्यांना बोचणारा कांटा व टोचणारी नांगी असे उरणार नाही; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
25प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल घराणे ज्या ज्या राष्ट्रांत पांगले आहे त्यांतून मी त्यांना एकत्र करीन आणि परराष्ट्रांदेखत त्यांच्या ठायी पवित्र ठरेन; मग जो देश मी आपला सेवक याकोब ह्याला दिला त्यात ते वस्ती करतील.
26ते त्यात निर्भय राहतील; ते घरे बांधतील, द्राक्षाचे मळे लावतील आणि त्यांच्या सभोवतालच्या त्यांच्या द्वेष्ट्यांना मी न्यायदंड करीन तेव्हा ते निर्भयपणे वसतील; मग त्यांना समजेल की, मी परमेश्वर त्यांचा देव आहे.”
सध्या निवडलेले:
यहेज्केल 28: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: