यहेज्केल 32
32
फारोसाठी विलाप
1बाराव्या वर्षी, बाराव्या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“मानवपुत्रा, मिसर देशाचा राजा फारो ह्याच्याविषयी विलाप कर; त्याला सांग , राष्ट्रांमध्ये तुला तरुण सिंहाची उपमा दिली होती, तरी तू महानदातल्या मगरासमान आहेस; तू आपल्या नद्यांमध्ये उसळ्या मारल्यास, आपल्या पायांनी पाणी गढूळ केलेस, व त्यांच्या सर्व नद्यांची घाण केलीस.
3प्रभू परमेश्वर म्हणतो, मी बहुत राष्ट्रांच्या द्वारे तुझ्यावर आपले जाळे टाकीन; ते तुला माझ्या जाळ्याने बाहेर ओढून काढतील.
4मी तुला जमिनीवर सोडून देईन, उघड्या मैदानात तुला फेकून देईन, आकाशातील सर्व पाखरे तुझ्यावर बसतील असे मी करीन, सर्व पृथ्वीवरील वनपशूंची तुझ्या मांसाने तृप्ती करीन.
5मी पर्वतांवर तुझे मांस ठेवीन, तुझ्या धिप्पाड देहाने खोरी भरीन.
6तुझ्या रक्तप्रवाहाने देश बुडवून टाकीन, तो पर्वताला जाऊन लागेल, सर्व नदीनाले तुझ्या रक्ताने भरतील.
7मी तुला नष्ट करीन तेव्हा मी आकाश झाकीन व त्यातील तारे निस्तेज करीन; मी सूर्य मेघाच्छादित करीन, चंद्र प्रकाश देणार नाही.
8मी आकाशातील सर्व ज्योती तुझ्यावर निस्तेज करीन, मी तुझ्या देशावर काळोख आणीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
9जी राष्ट्रे, जे देश तुझ्या ओळखीचे नाहीत त्यांत मी तुझ्या निःपाताचे वृत्त प्रसिद्ध करीन, तेव्हा मी बहुत राष्ट्रांचे मन उद्विग्न करीन.
10अनेक राष्ट्रे तुला पाहून भयचकित होतील असे मी करीन; मी आपली तलवार त्यांच्या राजांसमोर परजीन, तेव्हा ते थरथर कापतील; तुझ्या पतनाच्या दिवशी आपल्या जिवाच्या भीतीने त्यांचा क्षणोक्षणी थरकाप होईल.
11कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, बाबेलच्या राजाची तलवार तुझ्यावर येईल.
12वीरांच्या तलवारींनी मी तुझा लोकसमूह पाडीन; ते सर्व राष्ट्रांतले भयंकर पुरुष आहेत; ते मिसराचा गर्व हरण करतील; त्यांच्या सर्व लोकसमूहाचा विध्वंस होईल.
13महाजलांजवळील त्यांच्या सर्व गुराढोरांचा मी उच्छेद करीन; ह्यापुढे कोणा मनुष्याच्या पावलाने किंवा गुरांच्या खुराने ती गढूळ होणार नाहीत.
14तेव्हा मी त्यांचे जलाशय स्वच्छ करीन, त्यांच्या नद्या तेलाप्रमाणे वाहत्या करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
15मी मिसर देशातील सर्व रहिवाशांना मारून त्या देशांचे अरण्य करीन व देशातले सर्वकाही नाहीसे करून तो उजाड करीन, तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.
16हे विलापगीत लोक शोकपूर्वक म्हणतील; राष्ट्रांच्या कन्या ते शोकपूर्वक म्हणतील; मिसर देश व त्यातील सर्व लोकसमूह ह्यांसाठी ते शोकपूर्वक म्हणतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
17बाराव्या वर्षी, महिन्याच्या पौर्णिमेस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
18“मानवपुत्रा, मिसरी लोकसमूहासाठी विलाप कर; त्याला, मिसरकन्येला व प्रख्यात राष्ट्रांच्या कन्यांना गर्तेत उतरणार्यांबरोबर अधोलोकी लोटून दे.
19‘तू सौंदर्याने कोणापेक्षा वरचढ आहेस? चल, खाली उतर, आणि बेसुंत्यांबरोबर जाऊन पड.’
20तलवारीने वधलेल्यांमध्ये ते पडतील; तिला तलवारीच्या हवाली केले आहे; तिला व तिच्या सर्व समूहास ओढून न्या.
21वीरांमध्ये जे प्रमुख ते त्यांच्याबरोबर व त्यांच्या साहाय्यकर्त्यांबरोबर अधोलोकातून बोलतील; ‘ते खाली उतरले आहेत; हे बेसुंती तलवारीने वध पावून तेथे पडले आहेत.’
22अश्शूर व तिचा सर्व समुदाय तेथे आहे; त्यांच्या कबरा तिच्या कबरेसभोवती आहेत; ते सर्व तलवारीने वध पावून तेथे पडले आहेत;
23त्यांच्या कबरा गर्तेच्या अगदी तळाशी आहेत; तिच्यासभोवती त्यांचा समुदाय आहे; जिवंतांच्या भूमीस ज्यांनी दहशत घातली ते सर्व वध पावले आहेत, तलवारीने पडले आहेत.
24तेथे एलाम आहे व तिचा सर्व समुदाय तिच्या कबरेसभोवती आहे; जे जिवंतांच्या भूमीस दहशत घालीत ते सर्व वध पावले आहेत, तलवारीने पडले आहेत; ते बेसुंती अधोलोकी गेले आहेत; गर्तेत उतरणार्यांबरोबर ते अप्रतिष्ठा पावले आहेत.
25त्यांनी तिच्यासाठी व तिच्या सर्व समुदायासाठी वधलेल्यांमध्ये शय्या तयार केली आहे; तिच्यासभोवती त्यांच्या कबरा आहेत; ते सर्व बेसुंती इसम तलवारीने ठार झालेले आहेत; त्यांनी जिवंतांची भूमी दहशतीने भरली म्हणून गर्तेत उतरणार्यांबरोबर ते अप्रतिष्ठा पावले आहेत; वधलेल्यांमध्ये त्यांना ठेवले आहे.
26तेथे मेशेख, तुबाल व त्यांचा सर्व समूह हे आहेत; त्यांच्यासभोवती त्यांच्या कबरा आहेत; त्यांनी जिवंताची भूमी दहशतीने भरली आहे म्हणून ते सर्व बेसुंती इसम तलवारीने वध पावले.
27बेसुंती लोकांपैकी जे वीर समरांगणात पडून शस्त्रास्त्रांसह अधोलोकी गेले व ज्यांच्या तलवारी त्यांच्या उशाखाली ठेवण्यात आल्या अशांबरोबर हे पडून राहिले नाहीत काय? कारण जिवंताच्या भूमीत ते वीरांना दहशत घालत, म्हणून त्यांची पातके त्यांच्या हाडांच्या ठायी आहेत.
28तू बेसुंती लोकांमध्ये भंग पावशील व तलवारीने वध पावलेल्यांबरोबर तूही पडून राहशील.
29तेथे अदोम, त्याचे राजे व त्याचे सरदार हेही आहेत; ते सर्व शूर असूनही त्यांना तलवारीने ठार केलेल्यांबरोबर ठेवले आहे. त्यांना बेसुंती लोकांबरोबर व गर्तेत उतरणार्यांबरोबर ठेवले आहे.
30उत्तरेकडील सरदार व वधलेल्यांबरोबर उतरून गेलेले सीदोनी हे सर्व तेथे आहेत; त्यांच्या शौर्यामुळे त्यांचा वचक बसला होता तरी त्यांची अप्रतिष्ठा झाली; ते बेसुंती लोक तलवारीने वधलेल्यांबरोबर पडले आहेत व गर्तेत उतरणार्यांबरोबर अप्रतिष्ठा पावले आहेत.
31फारो त्यांना पाहील तेव्हा तो आपल्या सर्व लोकसमूहासंबंधाने समाधान पावेल; फारो व त्याचे सर्व सैन्य ह्यांना तलवारीने वधले आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
32मी फारोला जिवंतांच्या भूमीवर दहशत घातली तरी तो व त्याचा सर्व लोकसमूह ह्यांना बेसुंती लोकांमध्ये तलवारीने वधलेल्यांबरोबर ठेवले आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
सध्या निवडलेले:
यहेज्केल 32: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: