एज्रा 1
1
कोरेशाचे फर्मान
(२ इति. 36:22-23)
1यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने ह्या राजाच्या मनास स्फूर्ती दिली; तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात जाहीर केले व लेखी फर्मानही पाठवले, ते असे :
2“पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गींचा देव परमेश्वर ह्याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली असून अशी आज्ञा केली आहे की यहूदा प्रांतातील यरुशलेमेत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध;
3त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुमच्यामध्ये असेल - त्याच्याबरोबर त्याचा देव असो - त्याने यहूदातील यरुशलेमेस जाऊन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर बांधावे; यरुशलेमेत जो आहे तोच देव होय.
4जो कोणी शेष राहिला असून एखाद्या ठिकाणी उपरा म्हणून राहत असेल, त्याला तेथल्या माणसांनी चांदी, सोने, सामानसुमान व पशू देऊन साहाय्य करावे; ह्याखेरीज यरुशलेमेतील देवाच्या मंदिराकरता त्यांनी स्वसंतोषाची अर्पणे द्यावीत.” पाडाव करून नेलेले यरुशलेमेस परत येतात 5तेव्हा यरुशलेमेतील परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी वरती जाण्यास देवाने ज्यांच्या मनास स्फूर्ती दिली ते यहूदा व बन्यामीन ह्यांच्या पितृकुळांचे प्रमुख, याजक व लेवी उठून सिद्ध झाले.
6त्यांच्या आसपासच्या लोकांनी चांदीची पात्रे, सोने, सामानसुमान, पशू व मोलवान वस्तू देऊन त्यांना साहाय्य केले; ह्यांखेरीज लोकांनी जे स्वसंतोषाने दिले ते वेगळेच.
7नबुखद्नेस्सराने परमेश्वराच्या मंदिराची जी पात्रे यरुशलेमेहून आणून आपल्या दैवतांच्या देवळात ठेवली होती ती सर्व पारसाचा राजा कोरेश ह्याने बाहेर काढली.
8पारसाचा राजा कोरेश ह्याने ती मिथ्रदाथ भांडारी ह्याच्या हस्ते बाहेर काढून यहूदाचा सरदार शेशबस्सर ह्याला मोजून दिली.
9त्यांची यादी येणेप्रमाणे : सोन्याच्या तीस पराती, चांदीच्या एक हजार पराती, एकोणतीस सुर्या,
10सोन्याचे तीस कटोरे, चांदीचे दुसर्या प्रकारचे चारशे दहा कटोरे व इतर पात्रे एक हजार.
11सोन्याचांदीची सर्व पात्रे मिळून पाच हजार चारशे होती. पाडाव झालेले लोक बाबेलहून यरुशलेमेस आले तेव्हा शेशबस्सराने ही सर्व पात्रे आणली.
सध्या निवडलेले:
एज्रा 1: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: