एज्रा 4
4
विरोधक काम बंद पाडतात
1बंदिवासातून आलेले लोक इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ मंदिर बांधत आहेत असे यहूदा व बन्यामीन ह्यांच्या शत्रूंनी ऐकले, 2तेव्हा ते जरूब्बाबेल व पितृकुळांचे प्रमुख पुरुष ह्यांच्याकडे येऊन म्हणू लागले, “आम्हीही तुमच्याप्रमाणे तुमच्या देवाच्या भजनी लागलो आहोत; अश्शूरचा राजा एसर-हद्दोन ह्याने आम्हांला इकडे आणून ठेवले त्या दिवसापासून त्याच देवाला आम्ही यज्ञ करीत आलो आहोत; ह्यास्तव तुमच्याबरोबर आम्हांलाही मंदिर बांधूं द्या;”
3पण जरूब्बाबेल, येशूवा व इस्राएलाच्या पितृकुळांचे इतर प्रमुख त्यांना म्हणाले, “आमच्या देवासाठी मंदिर बांधण्याच्या बाबतीत आमच्याशी तुम्हांला काही कर्तव्य नाही; तर पारसाचा राजा कोरेश ह्याच्या आज्ञेप्रमाणे आम्हीच एकत्र होऊन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर बांधणार.”
4तेव्हा त्या देशाचे लोक यहूद्यांचे हात कमजोर करून त्यांना मंदिर बांधण्याच्या कामी अडथळा करू लागले.
5त्यांचा संकल्प व्यर्थ जावा म्हणून त्यांच्याशी विरोध करण्यासाठी त्यांनी पैसे देऊन वकील ठेवले; पारसाचा राजा कोरेश ह्याच्या सर्व कारकिर्दीत व पारसाचा राजा दारयावेश ह्याच्या कारकिर्दीपर्यंत हे असे चालले होते.
6अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या आरंभी त्यांनी यहूदा व यरुशलेम येथील रहिवाशांविरुद्ध एक कागाळी लिहून पाठवली.
7अर्तहशश्त ह्याच्या कारकिर्दीत बिश्लाम, मिथ्रदाथ, ताबेल व त्यांचे वरकड स्नेही ह्यांनी पारसाच्या राजाला पत्र लिहून पाठवले; हे पत्र अरामी लिपीत व अरामी भाषेत लिहिले होते.
8राजमंत्री रहूम व लेखक शिमशय ह्यांनी यरुशलेमेविरुद्ध अर्तहशश्त राजाला पुढे लिहिल्याप्रमाणे पत्र पाठवले.
9त्या प्रसंगी रहूम राजमंत्री, शिमशय लेखक व त्यांचे वरकड स्नेही म्हणजे दिनाई, अफर्सथखी, टर्पली, अफर्शी, अर्खवी, बाबेली, शूशनखी, देहावी, एलामी,
10इत्यादी लोक ज्यांना महान व प्रतापी आसनपर ह्याने नदीपार आणून शोमरोन नगरात व महानदाच्या पश्चिमेकडील बाकीच्या प्रदेशात वसवले होते, त्यांनी व इतर जनांनी हे पत्र लिहिले.
11अर्तहशश्त राजाला त्यांनी पत्र पाठवले त्याची नक्कल ही : “नदीच्या पश्चिमेकडील आपले सेवक इत्यादी - 12महाराजांना कळावे की जे यहूदी आपणाकडून निघून आले ते आमच्याकडे यरुशलेमेस येऊन पोहचले; त्यांनी ते बंडखोर व दुष्ट नगर बांधण्यास सुरुवात केली आहे; त्यांनी त्याचे कोट बांधून पुरे केले आहेत व पायाची दुरुस्ती होऊन चुकली आहे;
13महाराजांस हे विदित व्हावे की ते शहर बांधण्यात आले व त्याचा कोट बांधून झाला तर ते लोक खंडणी, कर व जकात द्यायचे नाहीत; एकंदरीत महाराजांचा मोठा तोटा होईल.
14आम्ही तर दरबाराचे मीठ खात आहोत व महाराजांची अशी अप्रतिष्ठा झालेली पाहणे आम्हांला शोभत नाही म्हणून आम्ही पत्र पाठवून महाराजांना हे कळवत आहोत;
15आपल्या वाडवडिलांच्या बखरी आपण शोधून पाहाल तर त्यावरून आपणांस कळून येईल की हे शहर बंडखोर असून राजांना व राष्ट्रांना उपद्रव करणारे आहे. प्राचीन काळापासून ह्यात राजद्रोह माजत आला आहे व ह्यामुळेच हे शहर उद्ध्वस्त केले होते.
16आम्ही महाराजांना हे निक्षून सांगतो की, हे नगर बांधण्यात आले व ह्याचे कोट बांधून तयार झाले तर महानदाच्या पश्चिमेकडे आपला काहीच मुलुख राहायचा नाही.”
17मग राजाने उत्तर पाठवले की, “रहूम राजमंत्री, शिमशय लेखक आणि शोमरोनात आणि महानदाच्या पश्चिमेकडे राहणारे त्यांचे इतर स्नेही ह्यांना सलाम, इत्यादी -
18“तुम्ही आमच्याकडे पाठवलेले पत्र आमच्यासमोर स्पष्टपणे वाचण्यात आले.
19माझ्या आज्ञेवरून शोध केला त्यात असे आढळून आले की प्राचीन काळापासून हे नगर राजांविरुद्ध बंड करीत आले आहे; बंड व राजद्रोह ह्यांचे हे माहेरघरच आहे.
20ह्या यरुशलेमेत पराक्रमी राजे होऊन गेले; त्यांनी महानदाच्या पश्चिमेकडल्या सगळ्या देशांवर राज्य केले; लोक त्यांना खंडणी, कर व जकात देत असत.
21तर आता असे फर्मान फिरवा की ह्या मनुष्यांनी काम बंद पाडावे, माझ्याकडून दुसरा हुकूम होईपर्यंत त्यांनी नगर बांधू नये.
22सांभाळा, ह्या गोष्टींसंबंधाने ढिलाई करू नका; राजाची हानी करणारा असा हा उपद्रव का वाढू द्यावा?”
23अर्तहशश्त राजाचे हे पत्र रहूम, शिमशय लेखक व त्यांचे स्नेही ह्यांना वाचून दाखवले, तेव्हा ते त्वरा करून यरुशलेमेस यहूद्यांकडे गेले आणि जुलमाने व जबरीने त्यांनी त्यांचे काम थांबवले.
24ह्या प्रकारे यरुशलेमेतील देवाच्या मंदिराचे काम थांबले आणि पारसाचा राजा दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षापर्यंत तहकूब राहिले.
सध्या निवडलेले:
एज्रा 4: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: