एज्रा 7
7
एज्रा व त्याचे लोक यरुशलेमेस येतात
1ह्यानंतर पारसाचा राजा अर्तहशश्त ह्याच्या कारकिर्दीत एज्रा बिन सराया बिन अजर्या बिन हिल्कीया 2बिन शल्लूम बिन सादोक बिन अहीटूब 3बिन अमर्या बिन अजर्या बिन मरोयाथ 4बिन जरह्या बिन उज्जी बिन बुक्की 5बिन अबीशूवा बिन फिनहास बिन एलाजार बिन अहरोन मुख्य याजक होता.
6हाच एज्रा बाबेलहून गेला; हा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता; त्याचा देव परमेश्वर ह्याचा वरदहस्त त्याच्यावर होता, म्हणून राजाने त्याचा सर्व मनोरथ पूर्ण केला.
7इस्राएल लोक, याजक, लेवी, गायक, द्वारपाळ व नथीनीम ह्यांतले काही जण मिळून अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी यरुशलेमेस गेले.
8राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात एज्रा यरुशलेमेस जाऊन पोहचला.
9पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस तो बाबेलहून निघाला; देवाचा वरदहस्त त्याच्यावर असल्यामुळे तो पाचव्या महिन्याच्या प्रतिपदेस यरुशलेमेस पोचला.
10परमेश्वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि इस्राएलास त्यातले नियम व निर्णय शिकवण्याचा एज्राने निश्चय केला होता.
11एज्रा याजक शास्त्री असून परमेश्वराची आज्ञावचने व त्याने इस्राएलास विहित केलेले नियम ह्यांत पारंगत होता; त्याला अर्तहशश्त राजाने जे पत्र दिले त्याची नक्कल ही :
12“स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री एज्रा याजक ह्याला राजाधिराज अर्तहशश्त इत्यादी;
13मी असे फर्मावतो की माझ्या राज्यातील जे इस्राएल लोक व त्यांचे जे याजक व लेवी आपखुशीने यरुशलेमेत जाऊ इच्छित असतील त्यांना तुझ्याबरोबर जाण्याची परवानगी आहे;
14तुझ्याजवळ देवाचे जे नियमशास्त्र आहे त्यानुसार यहूदा व यरुशलेम ह्यांची स्थिती आहे किंवा कसे ह्याचा तपास करावा म्हणून राजा व त्याचे सात मंत्री ह्यांच्याकडून तुला रवाना करण्यात येत आहे;
15आणि यरुशलेमनिवासी जो इस्राएलाचा देव त्याला राजाने व त्याच्या मंत्र्यांनी स्वसंतोषाने अर्पण केलेले सोने व रुपे तू न्यावेस;
16तसेच जेवढे सोने व रुपे सर्व बाबेल प्रांतात तुला मिळेल आणि लोक व याजक यरुशलेमेतील आपल्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ जे स्वसंतोषाचे अर्पण देतील ते सर्व तू न्यावेस.
17तू त्या पैशांचे बैल, मेंढे, कोकरे, व त्यांबरोबरची अन्नार्पणे व पेयार्पणे ही हयगय न करता खरेदी करून यरुशलेमेतील तुमच्या देवाच्या मंदिरात असलेल्या वेदीवर अर्पण करावीत.
18जे सोने व रुपे शिल्लक राहील त्याचा विनियोग तुला व तुझ्या भाऊबंदांना योग्य वाटेल तसा आपल्या देवाच्या इच्छेप्रमाणे करावा.
19तुझ्या देवाच्या मंदिराच्या सेवेसाठी जी पात्रे तुला देण्यात येत आहेत ती यरुशलेमेच्या देवासमोर सादर कर.
20ह्याहून आणखी देवाच्या मंदिरास लागणारे जे तुला द्यावे लागेल ते राजभांडारातून घ्यावे.
21मी अर्तहशश्त राजा महानदाच्या पश्चिमेकडील सर्व भांडार्यांस अशी आज्ञा करीत आहे की, एज्रा याजक जो स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत आहे तो जे काही तुमच्याकडे मागेल ते सर्व ताबडतोब त्याला द्यावे;
22रुपे शंभर किक्कारपर्यंत,1 गहू शंभर कोरपर्यंत,2 द्राक्षारस शंभर बथपर्यंत,2 तेल शंभर बथपर्यंत व लागेल तेवढे मीठ देण्यात यावे.
23जी काही आज्ञा स्वर्गीचा देव करील तिच्यानुसार स्वर्गीच्या देवाच्या मंदिरासाठी करण्यात यावे; राजा व त्याचे पुत्र ह्यांच्या राज्यावर त्याचा रोष होईल असे का होऊ द्यावे?
24तसेच आम्ही असे फर्मावतो की, देवाच्या ह्या मंदिरातील जे कोणी याजक, लेवी, गायक, द्वारपाळ, नथीनीम व इतर सेवक असतील त्यांच्यापासून खंडणी, कर अथवा जकात घ्यायची नाही.
25हे एज्रा, तुला तुझ्या देवाने ज्ञान दिले त्याच्या योगे शास्ते व न्यायाधीश ह्यांची नेमणूक कर; तुझ्या देवाचे नियमशास्त्र जाणणार्या अशा त्या महानदाच्या पश्चिमेकडील सर्व रहिवाशांचा त्यांनी न्यायनिवाडा करावा आणि त्यासंबंधाने जे अज्ञानी आहेत त्यांना तुम्ही शिकवावे.
26जे कोणी तुझ्या देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे आणि राजाच्या कायद्याप्रमाणे वागणार नाहीत त्यांना ताबडतोब शासन करावे; प्राणदंड, हद्दपारी, मालमत्तेची जप्ती अथवा कैद ह्यांतील कोणतीही शिक्षा त्यांना करावी.”
27यरुशलेमेतील देवाचे मंदिर शोभिवंत करावे अशी इच्छा राजाच्या मनात ज्याने उत्पन्न केली आहे तो आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर धन्य!
28राजा, त्याचे मंत्री व राजाचे सर्व पराक्रमी सरदार ह्यांची माझ्यावर दया व्हावी असे देवाने केले आहे. माझा देव परमेश्वर ह्याचा माझ्यावर वरदहस्त होता. त्यामुळे हिंमत धरून माझ्याबरोबर जाण्यासाठी इस्राएलातील प्रमुख पुरुष मी एकत्र केले.
सध्या निवडलेले:
एज्रा 7: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: