इब्री 8
8
यहूद्यांच्या याजकपणाहून प्रभू येशूचे याजकपण श्रेष्ठ
1सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की, स्वर्गामध्ये राजवैभवाच्या सिंहासनाच्या ‘उजवीकडे बसलेला’ असा प्रमुख याजक आपल्याला आहे.
2तो पवित्रस्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर ‘प्रभूने घातलेल्या’ खर्या ‘मंडपाचा’ सेवक आहे.
3प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पण करण्यास नेमलेला असतो, म्हणून ह्याच्याजवळही अर्पण करण्यास काहीतरी असणे अगत्याचे आहे.
4तो पृथ्वीवर असता तर तो याजकच नसता; कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत.
5“पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनवण्याची सावधगिरी ठेव,” ही आज्ञा, मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली, तसे तेही, जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करतात.
6तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे, जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे.
7कारण तो पहिला करार निर्दोष असता, तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता.
8लोकांना दोष लावून तो म्हणतो,
“परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत
आहेत की,
त्यांत इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे
ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन;
9मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून
त्यांना मिसर देशातून बाहेर आणले,
त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा
हा करार असणार नाही;
कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत,
आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले,
असे प्रभू म्हणतो.
10कारण परमेश्वर म्हणतो,
त्या दिवसांनंतर इस्राएलाच्या घराण्याशी
जो करार मी करीन तो हा :
मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन,
आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन,
आणि मी त्यांना देव असा होईन,
आणि ते मला माझे लोक असे होतील.
11तेव्हा ‘परमेश्वराला ओळखा’, असे प्रत्येक जण
आपल्या सहनागरिकाला, आणि प्रत्येक जण
आपल्या बंधूला, शिकवणार नाही.
कारण त्यांतील लहानांपासून थोरांपर्यंत
ते सर्व मला ओळखतील;
12कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी
क्षमाशील होईन, आणि त्यांची पापे मी
ह्यापुढे आठवणारच नाही.”
13त्याने ‘नवा’ असे म्हटल्यावर पहिल्या कराराला जुना असे ठरवले आहे; आणि जे जुने व जीर्ण होत आहे, ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे.
सध्या निवडलेले:
इब्री 8: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: