यशया 39
39
हिज्कीयाला बाबेलचे जासूद भेटतात
(२ राजे 20:12-19; २ इति. 32:27-31)
1त्या वेळी बलदानाचा पुत्र मरोदख बलदान,1 जो बाबेलचा राजा, त्याने हिज्कीयाला पत्रे व नजराणा ही पाठवली; कारण तो आजारी पडल्यानंतर बरा झाला असे त्याने ऐकले होते.
2तेव्हा त्यांच्यावर हिज्कीयाने खूश होऊन त्यांना आपले अमोल भांडार दाखवले; आपले सोनेरुपे, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सगळे शस्त्रागार, सारांश, आपल्या भांडागारात होते नव्हते ते सगळे त्याने त्यांना दाखवले, त्याच्या घरात व सगळ्या राज्यात त्यांना दाखवायचे काहीएक राहिले नाही.
3मग यशया संदेष्ट्याने हिज्कीया राजाकडे येऊन विचारले, “ही माणसे काय म्हणाली? व आपल्याकडे कोठून आली?” हिज्कीयाने उत्तर केले, “ती दूर देशाहून बाबेलहून माझ्याकडे आली होती.”
4मग त्याने विचारले, “त्यांनी आपल्या घरात काय-काय पाहिले?” हिज्कीयाने म्हटले, “माझ्या घरातले सर्वकाही त्यांनी पाहिले; त्यांना माझ्या भांडागारातले दाखवले नाही असे काहीच नाही.”
5तेव्हा यशया हिज्कीयाला म्हणाला, “सेनाधीश परमेश्वराचे वचन ऐक;
6पाहा, असे दिवस येत आहेत की तुझ्या घरात जे काही आहे व तुझ्या वाडवडिलांनी आजवर जे साठवून ठेवले आहे, ते सर्व बाबेलास नेण्यात येईल, काही शिल्लक राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.
7जे पुत्र तुला होतील, तुझ्या पोटी निर्माण होतील, त्यांच्यापैकी ज्या कोणास घेऊन जाण्यात येईल ते बाबेलच्या राजवाड्यात खोजे होऊन राहतील.”
8तेव्हा हिज्कीया यशयाला म्हणाला, “तू सांगितलेले परमेश्वराचे वचन यथायोग्य आहे.” तो आणखी म्हणाला, “माझ्या काळात तरी शांतता व स्थिरता राहील.”
सध्या निवडलेले:
यशया 39: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: