याकोब 5
5
श्रीमंतांनी केलेल्या जुलमाचे प्रतिफळ
1अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हांला होणार आहेत त्यांविषयी रडून आकांत करा.
2तुमचे धन नासले आहे व तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे.
3तुमचे सोने व तुमचे रुपे ह्यांवर जंग चढला आहे; त्यांचा तो जंग तुमच्याविरुद्ध साक्ष होईल, आणि तो ‘अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल.’ शेवटल्या दिवसासाठी ‘तुम्ही धन साठवले आहे.’
4पाहा, ज्या कामकर्यांनी तुमची शेते कापली त्यांची ‘तुम्ही’ अडकवून ठेवलेली ‘मजुरी ओरडत आहे;’ आणि कापणी करणार्यांचा आक्रोश ‘सेनाधीश प्रभूच्या कानी’ गेला आहे.
5तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला; ‘वधाच्या दिवशी’ तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली.
6नीतिमानाला तुम्ही दोषी ठरवले, त्याचा घात केला; तो तुम्हांला विरोध करत नाही.
सोशिकपणा बाळगावा म्हणून बोध
7अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता, त्याला ‘पहिला व शेवटला पाऊस’ मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो.
8तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे.
9बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका; पाहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे.
10बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दु:खसहन व त्यांचा धीर ह्यांविषयीचा कित्ता घ्या.
11पाहा, ‘ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो.’ तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे; ह्यावरून ‘प्रभू फार कनवाळू व दयाळू’ आहे हे तुम्हांला दिसून आले.
12माझ्या बंधूंनो, मुख्यत: शपथ वाहू नका; स्वर्गाची, पृथ्वीची, किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका; तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हांला ‘होय’ म्हणायचे तर ‘होय’ म्हणा; ‘नाही’ म्हणायचे तर ‘नाही’ म्हणा.
प्रार्थनेचे सामर्थ्य
13तुमच्यापैकी कोणी दु:ख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदात आहे काय? त्याने स्तोत्रे गावीत.
14तुमच्यापैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना1 बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी.
15विश्वासाची प्रार्थना दुखणाइताला वाचवील आणि प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असतील तर त्याला क्षमा होईल.
16तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.
17एलीया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता; त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली, आणि साडेतीन वर्षे पृथ्वीवर2 पाऊस पडला नाही.
18पुन्हा त्याने प्रार्थना केली; तेव्हा आकाशाने पाऊस पाडला, आणि भूमीने आपले फळ उपजवले.
19माझ्या बंधूनो, तुमच्यामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारी फिरवले,
20तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो तो त्याचा जीव मरणापासून3 वाचवील व ‘पापांची’ रास ‘झाकील’, हे ध्यानात ठेवा.
सध्या निवडलेले:
याकोब 5: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: