YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 17

17
मीखाने केलेली मूर्तिपूजा
1एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखा नावाचा एक मनुष्य राहत होता.
2तो आपल्या आईला म्हणाला, “जी अकराशे चांदीची नाणी तुझ्यापासून हिरावून नेल्याबद्दल तू शाप दिला होतास आणि ज्याबद्दल तू माझ्याजवळ बोलत होतीस ते पैसे माझ्याकडे आहेत. मीच ते घेतले होते.” तेव्हा त्याची आई म्हणाली, “बाळा, परमेश्वर तुझे कल्याण करो.”
3त्याने ती अकराशे चांदीची नाणी आपल्या आईला परत केल्यावर ती म्हणाली, “माझ्या मुलाच्या हितासाठी माझे हे पैसे मी परमेश्वराला मनापासून समर्पित केले आहेत. ह्यांची एक कोरीव मूर्ती व एक ओतीव मूर्ती करावी म्हणून हे पैसे मी आता तुला परत करते.”
4त्याने ते पैसे आपल्या आईला परत केले. तेव्हा तिने त्यांतली दोनशे नाणी सोनाराला दिली, आणि त्याने त्यांची एक कोरीव मूर्ती व एक ओतीव मूर्ती तयार केली; त्या मूर्ती मीखाच्या घरात ठेवण्यात आल्या.
5ह्या मीखाचे एक देवघर होते. त्याने एक एफोद आणि काही तेराफीम (कुलदेवतेची मूर्ती) तयार केल्या व आपल्या एका मुलाला दीक्षा देऊन आपला पुरोहित नेमले.
6त्या दिवसांत इस्राएलावर कोणी राजा नव्हता; जो तो आपल्याला योग्य दिसेल तसे करत असे.
7बेथलेहेम-यहूदा येथे यहूदा घराण्यातला एक तरुण लेवी उपरा म्हणून राहत होता.
8आपल्याला कोठेतरी राहायला जागा मिळाली तर पाहावे म्हणून तो यहूदातील बेथलेहेम नगर सोडून निघाला; आणि प्रवास करत करत एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरी आला.
9मीखाने त्याला विचारले, “तू कोठून आलास?” त्याने उत्तर दिले, “यहूदाच्या बेथलेहेमातला मी एक लेवी आहे; आसरा मिळेल तेथे जाऊन राहावे म्हणून मी फिरत आहे.”
10मीखा त्याला म्हणाला, “माझ्या येथे राहा. तू माझ्या वडिलासमान हो व पुरोहित म्हणून राहा. मी तुला प्रतिवर्षी दहा चांदीची नाणी व एक पोशाख देईन आणि तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था करीन.”
11मग तो लेवी त्या माणसाबरोबर राहायला तयार झाला; त्याने त्या तरुणाला आपल्या मुलाप्रमाणे वागवले.
12मीखाने त्या तरुण लेवीला दीक्षा दिली आणि तो त्याचा पुरोहित होऊन त्याच्या घरी राहू लागला.
13मग मीखा म्हणाला, “मी एक लेवी आपला पुरोहित करून ठेवल्यामुळे परमेश्वर माझे कल्याण करील अशी मला आता खात्री आहे.”

सध्या निवडलेले:

शास्ते 17: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन