ईयोब 2
2
1पुन्हा एक दिवस असा आला की, त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहिले; त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर येऊन उभा राहिला.
2परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू आता कोठून आलास?” सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे.”
3परमेश्वराने सैतानाला विचारले, “माझा सेवक ईयोब ह्याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्त्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही; त्याचा विनाकारण नाश करण्यास तू मला चिथवलेस, तरी तो आपल्या सत्त्वाला दृढ धरून राहिला आहे.”
4सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, “त्वचेसाठी त्वचा! मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.
5तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.”
6परमेश्वर सैतानाला म्हणाला, “पाहा, तो तुझ्या हाती आहे, त्याची प्राणहानी मात्र करू नकोस.”
7मग सैतान परमेश्वरासमोरून गेला; आणि त्याने ईयोबाला मोठमोठ्या गळवांनी नखशिखान्त अतिशय पिडले.
8ईयोबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली; आणि तो जाऊन राखेत बसला.
9तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, “तुम्ही अजून सत्त्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा.”
10तो तिला म्हणाला, “तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलतेस; देवापासून सुखच घ्यावे, आणि दु:ख घेऊ नये काय?” ह्या सर्व प्रसंगी ईयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही.
11ईयोबाचे तिघे मित्र अलीफज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी हे त्याच्यावर आलेल्या अरिष्टांविषयी ऐकून आपापल्या ठिकाणाहून निघाले; ईयोबाकडे आपण मिळून जावे व त्याच्या संकटाबद्दल खेद प्रदर्शित करून त्याचे समाधान करावे असा त्यांनी संकेत केला.
12त्यांनी ईयोबाला दुरून न्याहाळून पाहिले तेव्हा तो त्यांना ओळखता येईना; मग ते मोठ्याने रडले; प्रत्येकाने आपला झगा फाडला आणि आकाशाकडे धूळ उडवून त्यांनी ती आपल्या डोक्यांत घातली.
13ते सात दिवस व सात रात्री त्याच्याबरोबर जमिनीवर बसले; त्याचे दु:ख फार भारी आहे असे पाहून कोणी त्याच्याशी एकही शब्द बोलला नाही.
सध्या निवडलेले:
ईयोब 2: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: