ईयोब 21
21
दुष्टांची भरभराट होते असे ईयोब निक्षून सांगतो
1मग ईयोबाने प्रत्युत्तर केले,
2“ऐका, अहो, माझे भाषण लक्षपूर्वक ऐका; एवढ्यानेच माझे तुमच्याकडून सांत्वन होईल.
3मला बोलू द्या म्हणजे मी बोलतो; माझे बोलणे संपल्यावर खुशाल माझा उपहास करा.
4माझे गार्हाणे मनुष्यासंबंधाने आहे काय? मी अधीर का नसावे?
5माझ्याकडे चित्त देऊन विस्मित व्हा. आपल्या तोंडाला हात लावा.
6मला आठवण झाली की मी घाबरा होतो; माझ्या देहाला कंप सुटतो.
7दुष्ट का जिवंत राहतात? ते वयोवृद्ध का होतात? ते समृद्ध का होतात?
8त्यांच्यासमक्ष त्यांच्याबरोबर, त्यांच्या डोळ्यांसमोर, त्यांची मुलेबाळे नांदतात.
9त्यांची घरे शांतीत निर्भय असतात, देवाचा दंड त्यांच्यावर पडत नाही.
10त्यांचा बैल प्रजनन करतो; तो निष्फळ होत नाही; त्यांची गाय विते, गाभटत नाही.
11ते आपल्या मुलांचा थवा बाहेर सोडतात, त्यांची मुले नाचतात व बागडतात;
12ते डफ व वीणा ह्यांवर गातात; ते पाव्याचा नाद ऐकून उल्हास पावतात.
13ते आपले दिवस सुखासमाधानात घालवतात, व सहज क्षणात अधोलोकी जातात.
14हेच लोक देवाला म्हणत असत की, ‘आमच्यापासून दूर हो; तुझ्या मार्गाची ओळख आम्हांला नको;
15सर्वसमर्थ कोण आहे की आम्ही त्याची सेवा करावी? त्याची विनवणी करून आम्हांला लाभ तो काय?’
16पाहा, त्यांची समृद्धी त्यांच्या हाती नाही; दुष्ट लोकांचे विचार माझ्यापासून दूर असोत.
17दुष्टांचा दीप मालवला व त्यांच्यावर विपत्ती आली; देवाने त्यांच्यावर कोप करून त्यांना दुःखाचे वाटेकरी केले; असे कितीदा होते?
18वार्याने जसे धसकट उडते, तुफानाने जसे भूस उडते, तसे ते नष्ट झाले, असे कितीदा घडते?
19तुम्ही म्हणाल की, ‘देव दुर्जनाच्या पापाचे प्रतिफळ त्याच्या मुलांसाठी राखून ठेवतो,’ तर त्याने त्यालाच त्याचे प्रतिफळ द्यावे म्हणजे त्याला त्याचा अनुभव घडेल.
20तो आपल्याच डोळ्यांनी आपला नाश पाहो; तो सर्वसमर्थाच्या संतप्त कोपाचे प्राशन करो.
21कारण त्याच्या आयुष्याची1 मुदत खुंटली तर त्याच्यामागे त्याला आपल्या घराण्याची काय पर्वा राहील?
22स्वर्गातल्यांचाही न्याय करणार्या देवाला कोणी ज्ञान शिकवील काय?
23कोणी शक्तीच्या भरात, सुखासमाधानात असता मरतो.
24त्याच्या चरव्या दुधाने भरलेल्या असतात. त्याच्या हाडांतील मज्जा रसरशीत असते.
25कोणी सौख्याचा अनुभव न घेता जिवाच्या कष्टदशेत मरतो.
26ते दोघेही बरोबर मातीस मिळतात. कीटक त्यांना व्यापतात.
27पाहा, तुमचे मनोदय, माझ्या अहिताच्या तुमच्या योजना मला ठाऊक आहेत.
28तुम्ही म्हणता, ‘सरदाराचा वाडा कोठे राहिला आहे? दुष्ट राहत असत तो डेरा कोठे टिकला आहे?’
29तुम्ही देशाटन केलेल्यांना विचारले नाही काय? त्यांचे दाखले तुम्हांला पटले नाहीत काय?
30असे की अरिष्टाच्या दिवसासाठी दुर्जन राखले जातात; क्रोधाच्या दिवशी असे लोक निभावतात.
31त्याच्या वर्तनाविषयी त्याच्या तोंडावर कोण बोलेल? त्याच्या कृतकर्माचे प्रतिफळ त्याला कोण देईल?
32त्याला कबरेत पोचवतील; त्याच्या थडग्याची रखवाली करतील;
33दरीतली ढेकळे त्याला गोड लागतील; जसे पूर्वीचे असंख्य लोक गेले तसे सर्व लोक त्याच्या मागून जातील.
34तुमच्या उत्तरात दगा भरलेला आहे, तर तुम्ही माझे व्यर्थ सांत्वन का करता?”
सध्या निवडलेले:
ईयोब 21: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: