ईयोब 32
32
ईयोबाला प्रत्युत्तर करण्याचा आपला हक्क अलीहू सांगतो
1ईयोब स्वतःच्या दृष्टीने निर्दोष आहे हे पाहून त्या तिघा पुरुषांनी त्याला उत्तर देण्याचे सोडून दिले.
2मग राम घराण्यातील बरखेल बूजी ह्याचा पुत्र अलीहू ह्याचा राग भडकला; ईयोबाने देवाला निर्दोषी ठरवण्याचे सोडून स्वतःला निर्दोषी ठरवले, म्हणून त्याच्यावर त्याचा राग भडकला.
3आपल्या तिघा मित्रांना ईयोबाला उत्तर द्यायला सापडले नसताही त्यांनी त्याला दोषी ठरवले म्हणून त्यांच्यावरही त्याचा राग भडकला.
4ते वयाने मोठे होते म्हणून अलीहू ईयोबाशी भाषण करायला मिळेपर्यंत थांबला होता.
5त्या तिघा पुरुषांच्या तोंडून काही प्रत्युत्तर निघेना हे पाहून त्याचा राग भडकला.
6मग बरखेल बूजी ह्याचा पुत्र अलीहू ह्याने उत्तर दिले; तो म्हणाला, “मी अल्पवयी आहे व तुम्ही वयोवृद्ध आहात; म्हणून मी मुरवत धरली; आपले मत तुमच्यापुढे प्रकट करण्यास मी कचरलो.
7मला वाटले, जास्त दिवस पाहिलेल्यांनी भाषण करावे, बहुत वर्षे घालवलेल्यांनी अक्कल सांगावी;
8पण मानवाच्या ठायी आत्मा असतो; सर्वसमर्थाचा श्वास त्याला बुद्धी देतो.
9माणसे वयाने मोठी असली तरच ती ज्ञानी असतात, वयोवृद्ध असली तरच त्यांना खरेखोटे समजते, असे नाही.
10ह्याकरता मी म्हणतो की माझे ऐका; मीही आपले मत सांगतो.
11तुम्ही काही समर्पक उत्तरे शोधून काढाल ह्या आशेने मी तुमचे भाषण ऐकत राहिलो, तुमचे मुद्दे मी लक्षपूर्वक श्रवण केले.
12मी तुमचे बोलणे मन लावून ऐकले; तो पाहा, तुमच्यांतल्या कोणीही ईयोबाच्या पक्षाचे खंडण केले नाही. कोणी त्याला समर्पक उत्तर दिले नाही.
13देवच त्याचे खंडण करील, मनुष्याच्याने होणार नाही, इतके ज्ञान त्याच्या ठायी आम्हांला आढळून आले आहे असे म्हणू नका;
14कारण त्याने माझ्यावर वादाचा मोर्चा फिरवला नाही; तुमचे शब्द घेऊन मी त्यांना उत्तर देणार नाही.
15ते थक्क झाले आहेत, काही उत्तर देत नाहीत; शब्द त्यांना सोडून गेले आहेत.
16ते बोलत नाहीत, निरुत्तर होऊन उभे आहेत, म्हणून मी थांबावे काय?
17मीही माझ्यातर्फे बोलतो, माझे मत प्रकट करतो.
18माझ्या मनात शब्दांची गर्दी झाली आहे. माझा अंतरात्मा मला स्फूर्ती देत आहे.
19पाहा, माझे अंतर्याम बंद करून ठेवलेल्या द्राक्षारसाप्रमाणे झाले आहे, नव्या द्राक्षारसाच्या बुधल्यांप्रमाणे ते फुटायला आले आहे.
20मी बोललो तरच मला चैन पडेल. मी आपले तोंड उघडीन, उत्तर देईन.
21मी कोणाचा पक्ष धरणार नाही, कोणाची खुशामत करणार नाही.
22खुशामत करण्याचे मला ठाऊक नाही, असेल तर माझा उत्पन्नकर्ता मला तत्काळ घेऊन जाईल.
सध्या निवडलेले:
ईयोब 32: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: