यहोशवा 11
11
याबीन राजा व त्याच्याशी दोस्ती करणारे राजे ह्यांचा पराभव
1हासोराचा राजा याबीन ह्याने हे ऐकल्यावर मादोनाचा राजा योबाब आणि शिम्रोनाचा राजा व अक्षाफाचा राजा ह्यांना, 2तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात, किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात, तळवटीत आणि पश्चिमेकडील नाफोत-दोरात असलेल्या राजांना,
3आणि पूर्वेकडले व पश्चिमेकडले कनानी, तसेच अमोरी, हित्ती, परिज्जी व डोंगरवटीतले यबूसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रांतात राहणारे हिव्वी ह्यांना बोलावणे पाठवले.
4तेव्हा ते सगळे आपापल्या सेनांचा समुद्रकिनार्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले, त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते.
5ह्या सर्व राजांनी एकत्र जमून इस्राएलाशी लढण्यासाठी मेरोम सरोवराजवळ तळ दिला.
6मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नकोस, कारण उद्या मी ह्याच वेळी ते सर्व कापून काढलेले इस्राएलाच्या हाती देईन; त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक.”
7तेव्हा यहोशवा आपल्या सर्व योद्ध्यांसह मेरोम सरोवराजवळ अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला.
8परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ-माईमापर्यत आणि पूर्वेस मिस्पे खोर्यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की, त्यांच्यातला एकही जिवंत राहिला नाही.
9परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले.
10त्या वेळेस यहोशवाने मागे परतून हासोर घेतले, व त्याच्या राजाला तलवारीने ठार मारले; कारण पूर्वी हासोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होते.
11तेथल्या सर्व प्राण्यांना त्यांनी तलवारीने ठार मारून त्यांचा समूळ नाश केला; कोणताही प्राणी जिवंत ठेवला नाही; आणि त्याने हासोर नगराला आग लावून ते जाळून टाकले.
12परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने त्या राजांची सर्व नगरे सर्व राजांसह हस्तगत करून त्यांना तलवारीने ठार मारले व त्यांचा समूळ नाश केला.
13टेकड्यांवर असलेल्या नगरांपैकी कोणतेही नगर इस्राएलाने जाळले नाही; हासोर मात्र यहोशवाने जाळले.
14ह्या नगरातील सर्व मालमत्ता व गुरेढोरे इस्राएल लोकांनी लुटून नेली, पण त्यांनी तलवार चालवून प्रत्येक माणूस मारून टाकला, एकही प्राणी जिवंत ठेवला नाही.
15परमेश्वराने आपला सेवक मोशे ह्याला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने यहोशवाला आज्ञा केली आणि त्याप्रमाणे यहोशवाने केले; परमेश्वराने मोशेला आज्ञापिलेली कोणतीही गोष्ट करण्याचे त्याने सोडले नाही.
यहोशवा सबंध देश पादाक्रांत करतो
16अशा प्रकारे यहोशवाने डोंगरी मुलुख, सर्व नेगेब, सर्व गोशेन प्रांत, तळवट, अराबा इस्राएलाचा डोंगराळ प्रदेश व त्याची तळवट,
17तसेच सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनाच्या खोर्यातील बाल-गाद येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने हस्तगत केला; त्यांच्या सर्व राजांना त्याने धरून ठार मारले.
18त्या सर्व राजांशी यहोशवाने पुष्कळ दिवस युद्ध केले.
19गिबोनात राहणार्या हिव्व्यांखेरीज कोणत्याही नगराने इस्राएल लोकांशी तह केला नाही; ती सर्व त्यांनी लढून घेतली,
20कारण परमेश्वराचा असा हेतू होता की, आपण मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांचा समूळ नाश करावा, आणि त्यांना काहीच दयामाया न दाखवता त्यांचा संहार करावा. त्यांनी इस्राएलाशी युद्ध करायला बाहेर पडावे म्हणून त्याने त्यांची मने कठीण केली.
21त्या वेळी यहोशवाने डोंगराळ प्रदेशात जाऊन हेब्रोन, दबीर व अनाब येथे राहणार्या आणि यहूदाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणार्या व इस्राएलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणार्या अनाकी लोकांचा उच्छेद केला; यहोशवाने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला.
22इस्राएल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद ह्यांतले थोडे उरले.
23परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे यहोशवाने सर्व देश काबीज केला. यहोशवाने तो इस्राएलाला त्याच्या वंशांच्या हिश्शांप्रमाणे वतन म्हणून वाटून दिला; तेव्हा देशाला युद्धापासून विसावा मिळाला.
सध्या निवडलेले:
यहोशवा 11: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: