यहोशवा 6
6
यरीहोचा पाडाव
1(इस्राएल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही.) 2परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत.
3तुम्ही सगळे योद्धे ह्या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा.
4सात याजकांनी सात रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी रणशिंगे फुंकावीत.
5रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.”
6नंतर नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने याजकांना बोलावून म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजक सात रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चाला.”
7तो लोकांना म्हणाला, “चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कोशापुढे चालावे.”
8यहोशवाने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे सात याजक परमेश्वरापुढे सात रणशिंगे फुंकत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला.
9सशस्त्र लोक रणशिंगे वाजवणार्या याजकांपुढे चालत होते आणि रणशिंगे वाजत असताना पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते.
10मग यहोशवाने लोकांना अशी आज्ञा केली की, “मी तुम्हांला सांगेपर्यंत जयघोष करू नका, त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका; आज्ञा होताच जयघोष करा.”
11ह्या प्रकारे परमेश्वराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली; त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला.
12यहोशवा मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कोश उचलून घेतला.
13सात याजक रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी फुंकत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्यापुढे चालले; रणशिंगे फुंकली जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते.
14ते दुसर्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले; असे त्यांनी सहा दिवस केले.
15सातव्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या; त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या.
16सातव्या वेळी याजक रणशिंगे फुंकत असताना यहोशवा लोकांना म्हणाला, “जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे;
17हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे, मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्याबरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते.
18तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वथा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यांतली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणून तिला संकटात घालाल.
19पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहेत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.”
20तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला; लगेच लोकांनी आपापल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते हस्तगत केले.
21त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, गुरेमेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला.
22तेव्हा जे दोन पुरुष तो देश हेरायला गेले होते त्यांना यहोशवा म्हणाला, “तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा.”
23तेव्हा त्या तरुण हेरांनी आत जाऊन राहाबेला, तिच्या आईबापांना, भाऊबंदांना आणि तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्राएलाच्या छावणीबाहेर नेऊन ठेवले.
24मग त्यांनी ते नगर व त्यातले सर्वकाही आग लावून जाळले; मात्र सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली.
25यहोशवाने राहाब वेश्या, तिच्या बापाचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचवले; तिचा वंश आजपर्यंत इस्राएल लोकांमध्ये वसत आहे; कारण जे जासूद यरीहो हेरायला यहोशवाने पाठवले होते, त्यांना तिने लपवून ठेवले होते.
26त्या समयी यहोशवाने असा शाप दिला की, “जो कोणी यरीहो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.”
27ह्याप्रमाणे परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला, आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली.
सध्या निवडलेले:
यहोशवा 6: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: