लेवीय 25
25
शब्बाथवर्ष आणि योबेलवर्ष
(अनु. 15:1-11)
1सीनाय पर्वतावर परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांना असे सांग : मी तुम्हांला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहचल्यावर त्या देशाने परमेश्वराप्रीत्यर्थ शब्बाथ पाळावा.
3सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे द्राक्षमळ्याची छाटणी करून त्याचे पीक जमा करावे;
4पण सातव्या वर्षी देशाला परमविश्रामाचा शब्बाथ असावा; म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ शब्बाथ असावा; त्या वर्षी तू शेतात पेरणी करू नये आणि द्राक्षमळ्याची छाटणी करू नये.
5आपोआप उगवलेले धान्य कापू नये आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे तोडू नयेत; देशाच्या परमविश्रामाचे ते वर्ष असावे.
6देशाच्या शब्बाथाच्या उपजावर तुमचा, तुमच्या दासदासींचा, तुमच्या मजुरांचा व तुमच्याबरोबर राहणार्या परदेशीयांचा निर्वाह होईल;
7तुमचे पशू व तुमच्या देशातील जनावरे ह्यांना देशाचे सर्व उत्पन्न खायला मिळेल.
8सात शब्बाथवर्षे म्हणजे सात गुणिले सात एवढी वर्षे मोजा; ह्या सात शब्बाथवर्षांचा काळ एकोणपन्नास वर्षे होय.
9मग सातव्या महिन्याच्या दशमीस म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे.
10त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी; ह्या वर्षाला तुम्ही योबेल1 म्हणावे; ह्या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे.
11हे पन्नासावे वर्ष तुमचे योबेलवर्ष होय; त्या वर्षी तुम्ही काही पेरू नये, आपोआप उगवलेले कापू नये, आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही तोडू नयेत,
12कारण हे योबेलवर्ष होय; हे तुम्हांला पवित्र असावे; शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा.
13ह्या योबेलवर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे.
14तुम्ही आपल्या शेजार्याला काही विकाल किंवा त्याच्याकडून काही विकत घ्याल तेव्हा एकमेकांवर अन्याय करू नका.
15योबेलवर्षानंतर जितकी वर्षे झाली असतील त्यांच्या संख्येप्रमाणे आपल्या शेजार्यापासून मोल घ्यावे, व तितक्या वर्षांच्या उत्पन्नानुसार त्यांनी विक्री करावी.
16उरलेल्या वर्षांची संख्या अधिक असली तर त्या मानाने मोल वाढवावे आणि कमी असली तर त्या मानाने मोल कमी करावे, कारण जितकी पिके झाली असतील त्यांच्या हिशोबाने त्यांनी ती विक्री करावी.
17तुम्ही एकमेकांवर अन्याय करू नये, तर आपल्या देवाचे भय बाळगावे. कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.
18ह्याकरता तुम्ही माझे विधी आचरावेत आणि माझे नियम लक्षपूर्वक पाळावेत; असे केल्याने तुम्ही देशात सुरक्षित राहाल.
19देश आपला उपज देईल, तुम्ही पोटभर खाल आणि त्यात तुम्ही सुरक्षित राहाल.
20तुम्ही कदाचित म्हणाल, ‘सातव्या वर्षी आम्ही काही पेरायचे नाही व शेताचे उत्पन्न जमा करायचे नाही तर मग आम्ही त्या वर्षी काय खावे?’
21पण सहाव्या वर्षी मी तुम्हांला अशी बरकत देईन की जमीन तुम्हांला तीन वर्षांचे उत्पन्न देईल.
22मग आठव्या वर्षी तुम्ही पेराल आणि जुना साठा खात राहाल; नवव्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल.
23जमीन विकायची तर ती कायमची विकून टाकू नका, कारण जमीन माझी असून तुम्ही माझ्या आश्रयाला परके व उपरे आहात;
24म्हणून तुमच्या वतनाच्या सगळ्या व्यवहारात जमीन सोडवून घेण्याची तुम्ही तरतूद करावी.
25तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनाचा काही भाग विकला, तर त्याच्या सगळ्यात जवळच्या आप्ताने पुढे येऊन आपल्या भाऊबंदाने विकलेला भाग सोडवून घ्यावा.
26एखाद्या मनुष्याच्या वतनाचा भाग सोडवून घेता येण्याइतकी त्याची स्वतःची ऐपत वाढली,
27तर त्याने वतन विकले असेल त्या वर्षापासून हिशोब करून उरलेल्या वर्षांचे उत्पन्न विकत घेणार्याला द्यावे, आणि त्याने आपल्या वतनावर परत जावे.
28पण ते वतन परत मिळवण्याची त्याला ऐपत नसली, तर आपली विकलेली जमीन विकत घेणार्याच्या ताब्यात योबेलवर्षापर्यंत राहू द्यावी; योबेलवर्षी ती सुटेल तेव्हा त्याने आपल्या वतनावर परत जावे.
29एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले राहते घर विकले, तर ते विकल्यावर एका वर्षाच्या आत त्याला ते सोडवता येईल. ते सोडवण्याचा हक्क त्याला पूर्ण एक वर्ष राहील.
30पूर्ण एक वर्षाच्या आत ते सोडवले नाही तर तटबंदीच्या नगरात असलेले ते घर विकत घेणार्याचे होऊन पिढ्यानपिढ्या त्याच्या वंशात कायमचे राहील; योबेलवर्षी ते सुटणार नाही;
31पण तटबंदी नसलेल्या खेड्यातून जी घरे असतील ती देशातील शेतासमान लेखावीत; ती सोडवता येतील आणि योबेलवर्षी त्यांची सुटका होईल.
32तथापि लेव्यांच्या वतनाच्या नगरांविषयी म्हणायचे म्हणजे त्यांत बांधलेली घरे लेव्यांना पाहिजे तेव्हा सोडवता येतील.
33एखाद्या लेव्याचे वतनाच्या नगरातले घर दुसर्या कोणी सोडवले, तर आपल्या वतनाच्या नगरात विकलेले ते घर योबेलवर्षी सुटेल; कारण इस्राएल लोकांमध्ये लेव्यांचे वतन म्हटले म्हणजे त्यांच्या नगरातील घरेच होत.
34त्यांच्या नगराच्या शिवारातील समाईक जमीन विकायची नाही; ते त्यांचे कायमचे वतन होय.
35तुझा एखादा भाऊबंद कंगाल झाला आणि त्याच्याने काम होत नाही असे तुला दिसले तर तू त्याला आधार द्यावास. परक्याप्रमाणे अथवा उपर्याप्रमाणे त्याने तुझ्याजवळ राहावे.
36त्याच्यापासून व्याज अथवा वरताळा घेऊ नकोस; आपल्या देवाचे भय धरून आपल्याजवळ आपल्या भाऊबंदाला राहू दे.
37तू आपला पैसा त्याला व्याजाने देऊ नकोस किंवा आपले धान्य त्याला वाढीदिढीने देऊ नकोस.
38मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्हांला कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे ह्या हेतूने मी तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले.
39तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर कंगाल झाला व त्याने स्वत:ला तुला विकले तर त्याला दासाप्रमाणे राबवू नकोस,
40मजुराप्रमाणे किंवा उपर्याप्रमाणे त्याने तुझ्याजवळ राहावे; योबेलवर्षापर्यंत त्याने तुझी सेवाचाकरी करावी.
41त्या वर्षी आपल्या मुलाबाळांसह त्याने तुझ्यापासून निघून आपल्या कुटुंबात व आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे.
42कारण मिसर देशातून मी बाहेर काढलेले हे माझे दास होत. दासांप्रमाणे त्यांची विक्री करायची नाही.
43कठोरपणाने त्याच्यावर अधिकार चालवू नकोस, पण आपल्या देवाचे भय धर.
44तुम्हांला दास व दासी घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही आपल्या सभोवतालच्या राष्ट्रांतून घ्याव्यात; दास व दासी त्यांच्यातूनच खरेदी कराव्यात;
45ह्याशिवाय, तुमच्यामध्ये उपरे म्हणून राहणारे परदेशीय लोक आणि त्यांच्या पोटी तुमच्या देशात जन्मलेली त्यांची संतती ह्यांच्यातून तुम्ही दास व दासी खरेदी करावेत आणि ती तुमची मालमत्ता व्हावी.
46त्यांचा ताबा तुम्ही आपल्यामागे आपल्या मुलांना द्यावा, व ती त्यांच्या वतनाचा भाग ठरतील; त्या लोकांतून तुम्ही कायमचे दास करून घ्यावेत, पण तुमच्या इस्राएल भाऊबंदांनी एकमेकांवर आपला अधिकार कठोरपणाने चालवू नये.
47तुझा एखादा परदेशीय अथवा उपरा शेजारी धनवान झाला, व त्याच्याजवळ राहणारा तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वतःस त्या परदेशीयाला अथवा उपर्याला किंवा त्याच्या वंशातील एखाद्याला विकले असेल,
48तर त्याची विक्री झाल्यावरही त्याला सोडवून घेता येईल; त्याच्या भाऊबंदांपैकी कोणालाही त्याला सोडवता येईल;
49त्याचा चुलता, त्याचा चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा आप्त ह्यांना त्याला सोडवता येईल; अथवा तो स्वतःच धनवान झाला तर त्याला स्वतःची सुटका करवून घेता येईल.
50ज्याने त्याला विकत घेतले असेल त्याच्याबरोबर त्याने आपल्या विक्रीच्या वर्षापासून योबेलवर्षापर्यंत हिशोब करावा; वर्षांच्या संख्येप्रमाणे विक्रीचे मोल ठरवावे; मजुराच्या रोजाप्रमाणे मोल आकारण्यात यावे.
51योबेलास पुष्कळ वर्षे असली तर विक्रीच्या रकमेतून आपल्या सुटकेचे मोल त्या वर्षांच्या संख्येच्या प्रमाणात त्याला परत द्यावे.
52योबेलास थोडी वर्षे असली तर त्याने आपल्या धन्याबरोबर हिशोब करून त्याने आपल्या मुक्ततेचे मोल तेवढ्याच वर्षांच्या प्रमाणात त्याला परत द्यावे.
53त्याने आपल्या धन्याजवळ सालदाराप्रमाणे राहावे; त्याच्या धन्याने तुमच्यासमोर त्याच्यावर कठोरपणे अधिकार चालवू नयेत.
54अशा प्रकारे त्याची सुटका झाली नाही तर योबेलवर्षी आपल्या मुलाबाळांसह त्याची सुटका होईल.
55कारण इस्राएल लोक माझेच दास आहेत; मिसर देशातून काढलेले हे माझे दास आहेत; मी परमेश्वर तुमचा देव आहे.
सध्या निवडलेले:
लेवीय 25: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: