लेवीय 7
7
दोषार्पणाचा विधी
1दोषार्पणाचा विधी असा : हे अर्पण परमपवित्र होय.
2ज्या ठिकाणी होमबलीचा वध करायचा त्याच ठिकाणी दोषार्पणाच्या बलीचा वध करावा, आणि याजकाने त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.
3त्याची सर्व चरबी त्याने अर्पण करावी; त्याचे चरबीदार शेपूट, आतड्यांवर असलेली चरबी, 4दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत.
5त्यांचा याजकाने वेदीवर परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणून होम करावा; हे दोषार्पण होय.
6हा बली खाण्याचा हक्क याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे; तो पवित्र स्थळी खावा; तो परमपवित्र होय.
7पापार्पणासारखेच दोषार्पण; दोहोंचा विधी एकच. जो याजक त्याच्या द्वारे प्रायश्चित्त करील त्याचा त्याच्यावर हक्क आहे.
8जो याजक एखाद्या माणसासाठी होमबली अर्पण करील त्याचाच हक्क त्या होमबलीच्या कातड्यावर आहे.
9भट्टीत, कढईत किंवा तव्यावर भाजले जाणारे प्रत्येक अन्नार्पण ते अर्पण करणार्या याजकाचे आहे.
10प्रत्येक अन्नार्पण, तेलमिश्रित किंवा कोरडे, अहरोनाच्या सर्व मुलांचे होय; त्या सर्वांचा त्याच्यावर समान हक्क आहे.
शांत्यर्पणाचा विधी
11परमेश्वराप्रीत्यर्थ कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करायचा असेल तर त्याचा विधी असा :
12त्याला ते उपकारस्तुतीसाठी करायचे असेल तर तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या, तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिठाच्या तळलेल्या पोळ्या उपकारस्तुतीच्या यज्ञासहित अर्पाव्यात.
13त्याच्या उपकारस्तुतीच्या शांत्यर्पणांच्या यज्ञासहित त्याने खमीर घातलेल्या भाकरीही अर्पाव्यात.
14ह्या प्रत्येक अर्पणातून परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित केलेला अंश म्हणून त्याने एकेक पोळी अर्पावी; तिच्यावर शांत्यर्पणाचे रक्त शिंपडणार्या याजकाचा हक्क आहे.
15उपकारस्तुतीसाठी त्याने केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; सकाळपर्यंत त्यातील काही ठेवू नये.
16पण यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी ते तो अर्पण करील त्या दिवशी ते खावे; आणि जे काही त्यातले उरेल ते दुसर्या दिवशीही खावे;
17त्या यज्ञबलीचे काही मांस तिसर्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे.
18त्याच्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीच्या मांसापैकी काहीही तिसर्या दिवशी खाण्यात आले तर ते मान्य होणार नाही; उलट, ते अमंगळ ठरेल; आणि जो कोणी ते खाईल त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा भोगावी लागेल.1
19ज्या मांसाला एखाद्या अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये; ते अग्नीत जाळून टाकावे. जो कोणी शुद्ध असेल त्यानेच यज्ञबलीचे मांस खावे;
20पण कोणी आपल्या अशुद्धावस्थेत परमेश्वराप्रीत्यर्थ केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस खाल्ले तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.
21कोणा मनुष्याने एखाद्या अशुद्ध वस्तूला स्पर्श केला, मग ती अशुद्धता मनुष्याची असो, पशूची असो किंवा दुसर्या कोणत्याही अमंगळ पदार्थाची असो, आणि परमेश्वराप्रीत्यर्थ केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस त्याने खाल्ले, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”
22परमेश्वर मोशेला म्हणाला,
23“इस्राएल लोकांना असे सांग : तुम्ही बैलाची, मेंढराची अथवा बकर्याची चरबी खाऊ नये.
24मेलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी इतर काही कामासाठी वापरावी, पण ती मुळीच खाऊ नये.
25परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणून जो पशू अर्पण करतात त्याची चरबी कोणी खाल्ली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.
26तुम्ही आपापल्या निवासस्थानात पक्ष्याचे, जनावराचे वगैरे कसलेही रक्त खाऊ नये.
27जो कोणी रक्त खाईल त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”
28परमेश्वर मोशेला म्हणाला,
29“इस्राएल लोकांना असे सांग : जो कोणी परमेश्वराप्रीत्यर्थ आपल्या शांत्यर्पणाचा यज्ञबली अर्पण करील त्याने त्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून काही भाग परमेश्वराकडे आणावा;
30त्याने आपल्या हाताने परमेश्वराची हव्ये आणावीत, परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळण्यासाठी चरबीसहित ऊर आणावा.
31याजकाने वेदीवर त्या चरबीचा होम करावा, पण ऊर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा असावा.
32तुम्ही आपल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीची उजवी मांडी समर्पित केलेला अंश म्हणून याजकाला द्यावी.
33अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त आणि चरबी अर्पण करील त्याचा हक्क त्या उजव्या मांडीवर असावा.
34कारण इस्राएल लोकांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर आणि समर्पणाची मांडी ही मी त्यांच्याकडून घेऊन अहरोन याजक व त्याचे मुलगे ह्यांना दिली आहेत. ही दोन्ही इस्राएल लोकांकडून मिळणारे त्यांचे निरंतरचे हक्क होत.
35याजक ह्या नात्याने परमेश्वराची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याचे मुलगे सादर करण्यात आले त्या दिवशी, परमेश्वराच्या हव्यांपैकी हा त्याचा व त्याच्या मुलांचा अभिषेकाचा वाटा ठरला आहे;
36ज्या दिवशी परमेश्वराने त्यांना अभिषेक केला त्या दिवशी त्याने त्यांना इस्राएल लोकांकडून हा वाटा मिळावा अशी आज्ञा केली, म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांचा हा निरंतरचा हक्क ठरला आहे.”
37होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, (याजकाच्या) समर्पणाचे अर्पण आणि शांत्यर्पणाचा यज्ञबली ह्यांविषयीचा विधी हा;
38इस्राएल लोकांनी परमेश्वराप्रीत्यर्थ काय अर्पणे करावीत ह्याविषयी परमेश्वराने त्यांना सीनाय रानात आज्ञा केली त्या दिवशी त्याने मोशेला वरीलप्रमाणे सीनाय पर्वतावर हा विधी लावून दिला.
सध्या निवडलेले:
लेवीय 7: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: