लूक 4
4
अरण्यात येशूची परीक्षा
1येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला, आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले;
2तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसांत त्याने काही खाल्ले नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली.
3तेव्हा सैतान त्याला म्हणाला, “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यास ‘भाकर हो’ असे सांग.”
4येशूने त्याला उत्तर दिले : “‘मनुष्य केवळ भाकरीने नाही, तर देवाच्या प्रत्येक वचनाने’ जगेल असे लिहिले आहे.”
5मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली;
6आणि त्याला म्हटले, “ह्यांच्यावरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपवून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो.
7म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल.”
8येशूने त्याला उत्तर दिले,
“‘[अरे सैताना, माझ्या मागे हो, कारण,]
परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व
त्याचीच सेवा कर,’ असे शास्त्रात लिहिले आहे.”
9नंतर त्याने त्याला यरुशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी टाक, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की,
10‘तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतांना
तुझ्याविषयी आज्ञा देईल.’
11आणि ‘तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून
ते तुला हातांवर झेलून धरतील.”’
12येशूने त्याला उत्तर दिले की, “‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस’ असे सांगितले आहे.”
13मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला.
नासरेथात येशू
14नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली.
15तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देई आणि सर्व जण त्याचा महिमा वर्णन करीत.
16मग ज्या नासरेथात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचन करण्यास उभा राहिला.
17तेव्हा यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला; त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले आहे :
18“परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे,
कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास,
[भग्नहृदयी जनांस बरे करण्यास]
त्याने मला अभिषेक केला;
त्याने मला पाठवले आहे, ते अशासाठी की,
धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा
दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी,
ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे;
19परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी.”
20मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली.
21मग तो त्यांना म्हणू लागला की, “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.”
22तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्यांविषयी आश्चर्य करू लागले; ते म्हणू लागले, “हा योसेफाचा पुत्र ना?”
23त्याने त्यांना म्हटले, “खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की, ‘हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर; कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या येथेही आपल्या गावी कर.”’
24पुढे तो म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही.
25आणखी मी तुम्हांला खरे ते सांगतो की, एलीयाच्या दिवसांत साडेतीन वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा इस्राएलात पुष्कळ विधवा होत्या;
26तरी त्यांच्यातील एकीच्याहीकडे एलीयाला पाठवले नव्हते; तर ‘सीदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे’ मात्र त्याला पाठवले होते.
27तसेच अलीशा संदेष्ट्याच्या काळात इस्राएलात पुष्कळ कुष्ठरोगी होते; तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, तर सूरियाचा नामान मात्र शुद्ध झाला.”
28हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले.
29त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले, आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले.
30पण तो त्यांच्यामधून निघून गेला.
भूतग्रस्ताला बरे करणे
31तो गालीलातील कफर्णहूम गावी खाली आला. तो शब्बाथ दिवशी त्यांना शिक्षण देत असे.
32त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते.
33तेव्हा अशुद्ध भुताच्या आत्म्याने पछाडलेला कोणीएक माणूस सभास्थानात होता; तो मोठ्याने ओरडून म्हणाला,
34“अरे येशू नासरेथकरा! ‘तू आमच्यामध्ये का पडतोस?’ तू आमचा नाश करण्यास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र (पुरुष) तो.”
35तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, “गप्प राहा व ह्याच्यातून नीघ.” मग भूत त्या मनुष्याला त्यांच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाले.
36तेव्हा सर्व जण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात!”
37नंतर त्याच्याविषयीची ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली.
शिमोनाची सासू व इतर रोगी
38मग तो सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू कडक तापाने पडली होती, तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली.
39तेव्हा त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले, तेव्हा तिचा ताप निघाला व लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली.
40मग सूर्यास्ताच्या वेळी, ज्या सर्वांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती त्यांना त्यांनी त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यांना बरे केले.
41“तू ख्रिस्त, देवाचा पुत्र आहेस,” असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली; परंतु त्याने त्यांना धमकावले व बोलू दिले नाही; कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांना ठाऊक होते.
42मग दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आले, आणि आपल्यापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते.
43परंतु तो त्यांना म्हणाला, “मला इतर गावांनाही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे.”
44मग तो गालीलाच्या सभास्थानांमध्ये उपदेश करत फिरला.
सध्या निवडलेले:
लूक 4: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: