मत्तय 15
15
मानवी संप्रदाय व येशूची शिकवण
1मग यरुशलेमेहून परूशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, “आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात?
2कारण जेवणापूर्वी ते हात धूत नाहीत.”
3त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हीही आपल्या संप्रदायेकरून देवाची आज्ञा का मोडता?
4कारण देवाने असे म्हटले आहे की, तू ‘आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर’, आणि ‘जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’
5परंतु तुम्ही म्हणता की, ‘जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे, त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान करू नये.’
6अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे.
7अहो ढोंग्यांनो, तुमच्याविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला की,
8‘हे लोक [तोंड घेऊन माझ्याकडे येतात व]
ओठांनी माझा सन्मान करतात,
परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
9ते व्यर्थ माझी उपासना करतात;
कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात
ते असतात मनुष्याचे नियम.”’
10तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका व समजून घ्या :
11जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळवते.”
12नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, “हे वचन ऐकून परूशी नाराज झाले, हे आपल्याला कळले काय?”
13त्याने उत्तर दिले, “माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल.
14त्यांना असू द्या; ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.”
15पेत्र त्याला म्हणाला, “हा दाखला आम्हांला समजावून सांगा.”
16तो म्हणाला, “तुम्हीदेखील अज्ञानी आहात काय?
17जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौचकूपात टाकण्यात येते, हे तुम्हांला समजत नाही काय?
18जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळवते.
19कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोर्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात.
20ह्या गोष्टी माणसाला विटाळवतात; न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळवत नाही.”
एक परराष्ट्रीय भूतग्रस्त मुलगी
21नंतर येशू तेथून निघून सोर व सीदोन ह्या भागात गेला.
22आणि पाहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, “अहो प्रभूजी, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भुताने फारच जर्जर केली आहे.”
23तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, “तिला पाठवून द्या; कारण ती आमच्यामागून ओरडत येत आहे.”
24त्याने उत्तर दिले, “इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही.”
25तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, “प्रभूजी, मला साहाय्य करा.”
26त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नाही!”
27तिने म्हटले, “खरेच, प्रभूजी; तरी घरची कुत्रीही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेला चुरा खातात.”
28तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ होवो.” आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली.
पुष्कळ रोगी बरे होतात
29नंतर येशू तेथून निघून गालील समुद्राजवळ आला व डोंगरावर चढून तेथे बसला.
30मग लोकांचे थव्यांचे थवे त्याच्याकडे आले; त्यांच्याबरोबर लंगडे, व्यंग असलेले, आंधळे, मुके व दुसरे पुष्कळ जण होते; त्यांना त्यांनी त्याच्या पायांशी आणून ठेवले आणि त्याने त्यांना बरे केले.
31मुके बोलतात, व्यंग असलेले धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे पाहून लोकसमुदायाने आश्चर्य केले आणि इस्राएलाच्या देवाचा गौरव केला.
चार हजार लोकांना भोजन
32मग येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो, कारण ते आज तीन दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्यांच्याजवळ खायला काहीही नाही; कदाचित ते वाटेत कासावीस होतील; म्हणून त्यांना उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही.”
33शिष्य त्याला म्हणाले, “एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आमच्याजवळ रानात कोठून असणार?”
34येशूने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात, व काही लहान मासे.”
35मग त्याने लोकसमुदायांना जमिनीवर बसण्यास सांगितले.
36नंतर त्याने त्या सात भाकरी व मासे घेऊन उपकार-स्तुती केली, त्या मोडून शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या.
37मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या भरून घेतल्या.
38जेवणारे चार हजार पुरुष होते; त्याशिवाय स्त्रिया व मुले होतीच.
39मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या हद्दीत आला.
सध्या निवडलेले:
मत्तय 15: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: