मत्तय 24
24
मंदिराची धूळधाण व युगाची समाप्ती ह्यांविषयीचे येशूचे भविष्य
1मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवण्यास जवळ आले.
2तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “हे सर्व तुम्हांला दिसते ना? मी तुम्हांला खचीत सांगतो, येथे चिर्यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही.”
3तो जैतुनांच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकान्ती येऊन म्हणाले, “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हांला सांगा.”
4येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला कोणी फसवू नये, म्हणून सावध असा.
5कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन ‘मी ख्रिस्त आहे’ असे म्हणतील व अनेकांना फसवतील.
6तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल; घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा; कारण ‘असे होणे अवश्य आहे;’ परंतु तेवढ्यात शेवट होत नाही.
7कारण ‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल’ आणि जागोजागी दुष्काळ, मर्या व भूमिकंप होतील;
8पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहेत.
9तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हांला धरून देतील व तुम्हांला जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील.
10त्या वेळी ‘पुष्कळ जण अडखळतील’, एकमेकांना धरून देतील, व एकमेकांचा द्वेष करतील.
11पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांना फसवतील.
12आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल.
13परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.
14सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल.
15दानिएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात’ उभा असलेला तुम्ही पाहाल, (वाचकाने हे ध्यानात आणावे),
16तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे;
17जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरता खाली उतरू नये;
18आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता माघारी येऊ नये.
19त्या दिवसांत ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणार्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार!
20तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्बाथ दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा.
21कारण ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट’ त्या काळी येईल.
22आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.
23त्या वेळेस जर कोणी तुम्हांला म्हटले, ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे’ किंवा ‘तेथे आहे,’ तर ते खरे मानू नका.
24कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उठतील व साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून मोठी ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’
25पाहा, मी हे अगोदरच तुम्हांला सांगून ठेवले आहे.
26ह्यास्तव कोणी तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो अरण्यात आहे,’ तर जाऊ नका; तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो आतल्या खोल्यांत आहे,’ तर ते खरे मानू नका.
27कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.
28जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.
29त्या दिवसांतील संकटांनंतर लगेचच ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील;’
30तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल; मग ‘पृथ्वीवरील सर्व जातींचे लोक शोक करतील’ आणि ते ‘मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन’ पराक्रमाने व मोठ्या वैभवाने ‘येताना’ पाहतील;
31‘कर्ण्याच्या महानादाबरोबर’ तो आपल्या दूतांना पाठवील, आणि ‘ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्या सीमेपर्यंत’ त्याच्या निवडलेल्यांना ‘चार्ही दिशांकडून जमा करतील.’
जागृतीची आवश्यकता
32अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डाहळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता.
33तसेच तुम्हीही ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ, दाराशीच आहे असे समजा.
34मी तुम्हांला खचीत सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.
35आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.
36त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांना नाही, पुत्रालाही नाही.
37नोहाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.
38तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत ‘नोहा तारवात गेला’ त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते,
39आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहवून नेईपर्यंत त्यांना समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल.
40त्या वेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल.
41जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल.
42म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हांला ठाऊक नाही.
43आणखी हे समजा की, कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता, आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते.
44म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.
विश्वासू दास व दुष्ट दास ह्यांचा दृष्टान्त
45ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खाण्यास देण्यासाठी त्यांच्यावर नेमले आहे असा दास कोण?
46धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य.
47मी तुम्हांला खचीत सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.
48परंतु ‘माझा धनी येण्यास विलंब लागेल’ असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल,
49आणि आपल्या सोबतीच्या दासांना मारू लागेल व झिंगलेल्यांबरोबर खाईलपिईल,
50तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी व त्याला माहीत नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन
51त्याला छाटून टाकील व ढोंग्यांना देण्याचा वाटा त्याच्या पदरी बांधील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.
सध्या निवडलेले:
मत्तय 24: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: