नंतर येशू त्यांच्या सभास्थानांत शिकवत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करत सर्व नगरांतून व गावांतून फिरत होता. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.”
मत्तय 9 वाचा
ऐका मत्तय 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 9:35-38
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ