नहेम्या 3
3
दुरुस्ती करायच्या विभागांची वाटणी
1मग मुख्य याजक एल्याशीब व त्याचे याजकबांधव उठून मेंढेवेस बांधू लागले; त्यांनी तिची प्रतिष्ठापना करून तिला कवाडेही लावली; हमेआ बुरुजापर्यंत, हनानेल बुरुजापर्यंत त्यांनी तिची प्रतिष्ठापना केली.
2त्याच्या शेजारी यरीहोच्या लोकांनी बांधकाम केले; आणि त्यांच्या शेजारी जक्कूर बिन इम्री ह्याने बांधकाम केले.
3मत्स्यवेस हस्सनाच्या पुत्रांनी बांधली; त्यांनी तिला तुळया घातल्या, तिला कवाडे लावली आणि कड्या व अडसर लावले.
4त्यांच्या शेजारी मरेमोथ बिन उरीया बिन हक्कोस ह्याने डागडुजी केली. त्यांच्या शेजारी मशुल्लाम बिन बरेख्या बिन मशेजबेल ह्याने डागडुजी केली. त्यांच्या शेजारी सादोक बिन बाना ह्याने डागडुजी केली.
5त्यांच्या शेजारी तकोवाकरांनी डागडुजी केली; पण त्यांच्या महाजनांनी आपल्या मानेवर आपल्या प्रभूच्या कामाचे जू घेतले नाही.
6जुन्या वेशीची डागडुजी यहोयादा बिन पासेहा व मशुल्लाम बिन बसोदया ह्यांनी करून तिला तुळया घातल्या, तिला कवाडे लावली आणि कड्या व अडसर लावले.
7त्यांच्या शेजारी मलत्या गिबोनी व यादोन मेरोनोथी ह्यांनी आणि गिबोन व मिस्पा येथील जे लोक महानदाच्या पश्चिमेकडील प्रांतांच्या अधिपतीच्या सत्तेखाली होते त्यांनी डागडुजी केली.
8त्यांच्या शेजारी सोनारांपैकी उज्जीएल बिन हरहया ह्याने डागडुजी केली. त्याच्या शेजारी गांध्यांपैकी हनन्या ह्याने डागडुजी केली. त्यांनी रुंद कोटापर्यंत यरुशलेमेची मजबुती केली.
9त्यांच्या शेजारी यरुशलेम जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी रफाया बिन हूर ह्याने डागडुजी केली.
10त्यांच्या शेजारी यदाया बिन हरूमफ ह्याने आपल्या घरासमोरच्या तटाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी हत्तूश बिन हशबन्या ह्याने डागडुजी केली.
11मल्कीया बिन हारीम आणि हश्शूब बिन पहथ-मवाब ह्यांनी दुसर्या एका भागाची व भट्टीबुरुजाची डागडुजी केली.
12त्याच्या शेजारी यरुशलेम जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी शल्लूम बिन हल्लोहेश व त्याच्या कन्या ह्यांनी डागडुजी केली.
13खोरेवेशीची डागडुजी हानून व जानोहेकरांनी केली; त्यांनी ती बांधून तिला कवाडे, कड्या व अडसर लावले, तसेच उकिरडावेशीपर्यंत एक हजार हात कोट बांधला.
14उकिरडावेशीची डागडुजी बेथ-हक्करेम जिल्ह्याचा अधिकारी मल्कीया बिन रेखाब ह्याने केली; त्याने ती बांधून तिला कवाडे, कड्या व अडसर लावले.
15झरावेशीची डागडुजी मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी शल्लूम बिन कोल-होजे ह्याने केली; तसेच त्याने ती बांधून तिला छप्पर केले व कवाडे, कड्या व अडसर लावले; तसेच त्याने दावीदपुराहून उतरण्याच्या जिन्यापर्यंत राजाच्या बागेजवळील शेलह तळ्याचा कोट बांधला.
16त्याच्यानंतर बेथ-सूर जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी नहेम्या बिन अजबूक ह्याने डागडुजी केली; ती त्याने दाविदाच्या थडग्यासमोर, तेथे केलेल्या तळ्यापर्यंत, वीरगृह नामक ठिकाणापर्यत केली.
17त्याच्यानंतर लेव्यांपैकी रहूम बिन बानी ह्याने डागडुजी केली. त्याच्याजवळच कईला जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी हशब्या ह्याने आपल्या जिल्ह्यातर्फे डागडुजी केली.
18त्याच्यानंतर त्याच्या भाऊबंदांपैकी कईला जिल्ह्याच्या दुसर्या अर्ध्या भागाचा अधिकारी बवई बिन हेनादाद ह्याने डागडुजी केली.
19त्याच्या शेजारी दुसर्या एका भागी जेथे कोट वळसा घेतो व शस्त्रागाराकडे जाण्याची चढण लागते तेथे मिस्पाचा अधिकारी एजेर बिन येशूवा ह्याने डागडुजी केली.
20त्याच्यानंतर कोट वळसा घेतो तेथून मुख्य याजक एल्याशीब ह्याच्या घराच्या दारापर्यंत बारूख बिन जब्बई ह्याने आस्थेने दुसर्या एका भागाची डागडुजी केली.
21त्याच्यानंतर एल्याशिबाच्या घराच्या दारापासून एल्याशिबाच्या घराच्या शेवटापर्यंत मरेमोथ बिन उरीया बिन हक्कोस ह्याने दुसर्या एका भागाची डागडुजी केली.
22त्याच्यानंतर तळवटीत राहणारे याजक ह्यांनी डागडुजी केली.
23त्याच्यानंतर बन्यामीन व हश्शूब ह्यांनी आपल्या घरासमोरच्या भागाची डागडुजी केली. त्यांच्या शेजारी अजर्या बिन मासेया बिन अनन्या ह्याने आपल्या घरानजीक डागडुजी केली.
24त्याच्यानंतर अजर्याच्या घरापासून कोट वळसा घेतो तेथवर व कोपर्यापर्यंत बिन्नुई बिन हेनादाद ह्याने दुसर्या एका भागाची डागडुजी केली.
25कोट वळसा घेतो त्यासमोर गारद्यांच्या अंगणाजवळ राजमंदिराबाहेर असलेल्या उंच बुरुजाची डागडुजी पलाल बिन उजई ह्याने केली. त्याच्या शेजारी पदाया बिन परोश ह्याने डागडुजी केली.
26(नथीनीम हे ओफेलात, पूर्वेकडल्या पाणीवेशीसमोर व पुढे आलेल्या बुरुजापर्यंत राहत होते.)
27पदायाच्या शेजारी पुढे आलेल्या मोठ्या बुरुजासमोर ओफेलच्या कोटापर्यंत तकोवाकरांनी डागडुजी केली.
28घोडेवेशीपासून याजकांनी आपापल्या घरांपुढे डागडुजी केली.
29त्यांच्या शेजारी सादोक बिन इम्मेर ह्याने आपल्या घरापुढच्या भागाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी पूर्ववेशीचा द्वारपाळ शमाया बिन शखन्या ह्याने डागडुजी केली.
30त्याच्या शेजारी हनन्या बिन शलेम्या आणि सालफाचा सहावा पुत्र हानून ह्यांनी दुसर्या एका भागाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी मशुल्लाम बिन बरेख्या ह्याने आपल्या कोठडीपुढे डागडुजी केली.
31त्याच्या शेजारी सोनारांपैकी मल्कीया ह्याने नथीनीम व व्यापारी ह्यांच्या घरांपर्यंत सभावेशीसमोर कोपर्यावरच्या कोठीपर्यंत डागडुजी केली.
32कोपर्यावरच्या कोठीपासून मेंढेवेशीपर्यंत सोनारांनी व व्यापार्यांनी डागडुजी केली.
सध्या निवडलेले:
नहेम्या 3: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: