नहेम्या 7
7
नहेम्या यरुशलेमेवर अधिकारी नेमतो
1कोट बांधण्याचे काम संपल्यावर मी त्याला दरवाजे बसवले आणि द्वारपाळ, गायक व लेवी ह्यांची नेमणूक केली;
2तेव्हा मी आपला भाऊ हनानी व गढीचा अधिपती हनन्या ह्यांना यरुशलेमेचे अधिकारी नेमले; हा हनन्या इमानी असून इतर पुष्कळ लोकांहून देवाचे भय विशेष बाळगत असे.
3मी त्यांना सांगितले, “उन्हाचा ताप होईपर्यंत यरुशलेमेच्या वेशी उघडू नयेत, लोक काम करीत असता वेशींचे दरवाजे लावून त्यांना अडसर घालावेत, यरुशलेमकरांचे पहारे नेमावेत आणि प्रत्येकाने आपापल्या घरासमोर पहारा करावा.”
4नगर विस्तीर्ण व मोठे होते, पण त्यात लोक थोडे असून अद्यापि घरे बांधली नव्हती.
बंदिवासातून परतणार्यांची यादी
(एज्रा 2:1-70)
5सरदार, शास्ते व इतर लोक जमा करून त्यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी असे माझ्या देवाने माझ्या मनात घातले. जे प्रथम यरुशलेमेत आले होते त्यांच्या वंशावळीची वही मला सापडली व तिच्यात हे लिहिलेले सापडले : 6बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने जे लोक धरून नेले होते त्यांतले त्या मुलखात राहत होते ते लोक बंधमुक्त होऊन यरुशलेमेस व यहूदातील आपापल्या नगरांत परत गेले ते हे : 7येशूवा, नहेम्या, अजर्या, राम्या, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ, बिग्वई, नहूम, व बाना. जे जरूब्बाबेलबरोबर आले ते हेच. इस्राएल लोकांतल्या मनुष्यांची संख्या ही होती : 8परोशाचे वंशज दोन हजार एकशे बहात्तर.
9शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर.
10आरहाचे वंशज सहाशे बावन्न.
11येशूवा व यवाब ह्यांच्या कुळांतील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशे अठरा.
12एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न.
13जत्तूचे वंशज आठशे पंचेचाळीस.
14जक्काईचे वंशज सातशे साठ.
15बिन्नुईचे वंशज सहाशे अठ्ठेचाळीस.
16बेबाईचे वंशज सहाशे अठ्ठावीस.
17अजगादाचे वंशज दोन हजार तीनशे बावीस.
18अदोनीकामाचे वंशज सहाशे सदुसष्ट.
19बिग्वईचे वंशज दोन हजार सदुसष्ट.
20आदीनाचे वंशज सहाशे पंचावन्न.
21हिज्कीयाच्या आटेराचे वंशज अठ्ठ्याण्णव.
22हाशूमाचे वंशज तीनशे अठ्ठावीस.
23बेसाईचे वंशज तीनशे चोवीस.
24हारीफाचे वंशज एकशे बारा.
25गिबोनाचे वंशज पंचाण्णव.
26बेथलेहेम व नटोफा येथील माणसे एकशे अठ्ठ्याऐंशी.
27अनाथोथाची माणसे एकशे अठ्ठावीस.
28बेथ-अजमावेथाची माणसे बेचाळीस.
29किर्याथ-यारीम, कफीरा व बैरोथ येथील माणसे सातशे त्रेचाळीस.
30रामा व गेबा येथील माणसे सहाशे एकवीस.
31मिखमासाची माणसे एकशे बावीस.
32बेथेल व आय येथील माणसे एकशे तेवीस.
33दुसर्या नबोची माणसे बावन्न.
34दुसर्या एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न.
35हारीमाचे वंशज तीनशे वीस.
36यरीहोचे वंशज तीनशे पंचेचाळीस.
37लोद, हादीद व ओनो ह्यांचे वंशज सातशे एकवीस.
38सनावाचे वंशज तीन हजार नऊशे तीस.
39याजक : यदयाच्या कुळातील येशूवाच्या घराण्यातील नऊशे त्र्याहत्तर.
40इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न.
41पशहूराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस.
42हारीमाचे वंशज एक हजार सतरा.
43लेवी : येशूवाचे वंशज, कदमीएलाचे होदवाच्या वंशजांतले, चौर्याहत्तर.
44गाणारे : आसाफाचे वंशज एकशे अठ्ठेचाळीस.
45द्वारपाळ शल्लूमाचे वंशज, अटेराचे वंशज, तल्मोनाचे वंशज, अक्कूबाचे वंशज, हतीताचे वंशज, शोबाचे वंशज, एकशे अडतीस.
46नथीनीम : सीहाचे वंशज, हशूफाचे वंशज, तब्बावोथाचे वंशज,
47केरोसाचे वंशज, सीयाचे वंशज, पादोनाचे वंशज,
48लबोनाचे वंशज, हगाबाचे वंशज, सल्माईचे वंशज,
49हानानाचे वंशज, गिद्देलाचे वंशज, गहाराचे वंशज,
50रायाचे वंशज, रसीनाचे वंशज, नकोदाचे वंशज,
51गज्जामाचे वंशज, उज्जाचे वंशज, पासेहाचे वंशज,
52बेसाईचे वंशज, मऊनीमाचे वंशज, नफूशेसीमाचे वंशज,
53बकबुकाचे वंशज, हकूफाचे वंशज, हर्हूराचे वंशज,
54बसलीथाचे वंशज, महीदाचे वंशज, हर्षाचे वंशज,
55बर्कोसाचे वंशज, सीसराचे वंशज, तामहाचे वंशज,
56नसीहाचे वंशज, हतीफाचे वंशज.
57शलमोनाच्या चाकरांचे वंशज, सोताईचे वंशज, सोफेरेथाचे वंशज, परिदाचे वंशज.
58यालाचे वंशज, दर्कोनाचे वंशज, गिद्देलाचे वंशज.
59शफाट्याचे वंशज, हत्तीलाचे वंशज, हस्सबाइमाच्या पोखरेथाचे वंशज, आमोनाचे वंशज.
60सर्व नथीनीम व शलमोनाच्या चाकरांचे वंशज मिळून तीनशे ब्याण्णव होते.
61तेल-मेलह, तेल-हर्शा, करूब, अद्दोन व इम्मेर येथून जे वर आले ते हेच; पण ते इस्राएलांपैकी होते की नव्हते ह्याविषयी त्यांना आपापले पितृकूळ व आपापली वंशावळी दाखवता आली नाही;
62दलायाचे वंशज, तोबीयाचे वंशज, नकोदाचे वंशज, सहाशे बेचाळीस.
63याजकांपैकी : हबायाचे वंशज, हक्कोसाचे वंशज व बर्जिल्लयाचे वंशज; ह्या बर्जिल्लयाने गिलादी बजिल्लय ह्याच्या कन्यांपैकी एकीशी लग्न केले, आणि त्याचे नाव घेतले.
64ह्यांनी आपल्या वंशावळीचे पत्र इतर वंशावळ्यांच्या पत्रांत शोधून पाहिले, पण ते सापडले नाही, म्हणून ते अशुद्ध ठरून त्यांना याजकपदाच्या यादीतून काढून टाकले.
65तिर्शाथा (प्रांताधिपती) ह्याने त्यांना सांगितले की, “उरीम व थुम्मीम धारण करणारा याजक उभा राहीपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र पदार्थ खाऊ नयेत.”
66सर्व मंडळीतले लोक मिळून बेचाळीस हजार तीनशे साठ भरले;
67त्यांखेरीज त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस दास-दासी व दोनशे पंचेचाळीस गाणारे व गाणारणी होत्या.
68त्यांचे घोडे सातशे छत्तीस, खेचरे दोनशे पंचेचाळीस,
69उंट चारशे पस्तीस व गाढवे सहा हजार सातशे वीस एवढी होती.
70पितृकुळांच्या प्रमुखांपैकी काहींनी ह्या कार्यास मदत केली. तिर्शाथाने एक हजार दारिक1 सोने, पन्नास कटोरे व पाचशे तीस याजकीय वस्त्रे एवढी भांडारात जमा केली.
71पितृकुळातील आणखी काही पुरुषांनी ह्या कामाच्या खजिन्यात वीस हजार दारिक सोने, आणि दोन हजार दोनशे माने1 रुपे पावती केले.
72वरकड लोकांनी वीस हजार दारिक सोने, दोन हजार माने रुपे आणि सदुसष्ट याजकीय वस्त्रे पावती केली.
73ह्या प्रकारे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व इतर काही लोक; नथीनीम व सर्व इस्राएल आपापल्या नगरांत राहू लागले. सातवा महिना आला तेव्हा सर्व इस्राएल आपापल्या नगरात होते.
सध्या निवडलेले:
नहेम्या 7: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: