नहेम्या 9
9
इस्राएलाच्या पापांबद्दल एज्राची कबुली
1ह्याच महिन्याच्या चोविसाव्या दिवशी इस्राएल लोक उपास करून गोणपाट पांघरून व डोक्यात धूळ घालून एकत्र झाले.
2इस्राएल वंशातील लोक विदेश्यांपासून निराळे झाले, आणि उभे राहून त्यांनी आपली पातके आणि आपल्या पूर्वजांचे अपराध कबूल केले.
3ते आपल्या जागी उभे राहून दिवसाच्या एक प्रहरभर (तीन तास) आपला देव परमेश्वर ह्याच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचत राहिले, व आणखी एक प्रहर आपली पातके कबूल करत आणि आपला देव परमेश्वर ह्याची उपासना करत राहिले.
4मग येशूवा, बानी, कदमीएल, शबन्या, बुन्नी, शेरेब्या, बानी व कनानी ह्यांनी लेव्यांच्या मंचांवर उभे राहून उच्च स्वराने आपला देव परमेश्वर ह्याचा धावा केला.
5मग येशूवा, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या व पथह्या हे लेवी म्हणाले, “उभे राहा आणि आपला देव परमेश्वर ह्याचा येणेप्रमाणे धन्यवाद अनंतकाळ करा : तुझे वैभवशाली नाम धन्य असो; ते सर्व धन्यवाद व स्तवन ह्यांपलीकडे आहे.
6तूच एक परमेश्वर आहेस; आकाश व अत्युच्च आकाश व त्यांतील सर्व नक्षत्रगण, पृथ्वी व तिच्यावर वसणारे सर्व, जलाशय त्यांत असलेले सर्वकाही ह्यांचा तू उत्पन्नकर्ता व पालनकर्ता आहेस; स्वर्गातील सेना तुला नमन करते.
7हे परमेश्वरा, तूच देव आहेस; तू अब्रामास निवडून घेऊन खास्द्यांच्या ऊर गावातून बाहेर आणले व त्याला अब्राहाम हे नाव दिले.
8आणि त्याचे अंत:करण तुझ्यासंबंधाने एकनिष्ठ आहे असे पाहून तू त्याच्याशी करार केलास की मी तुझ्या वंशजांना कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी व गिर्गाशी ह्यांचा देश देईन; तू हे आपले वचन पुरे केले आहेस, कारण तू न्यायी आहेस;
9नंतर तू मिसर देशात आमच्या पूर्वजांचे कष्ट पाहिले व तांबड्या समुद्राच्या तीरी त्यांचा धावा ऐकला;
10फारो, त्याचे सेवक, त्याच्या देशाचे सर्व लोक ह्यांना चिन्हे व अद्भुत कृत्ये तू दाखवलीस; कारण ते त्यांच्याशी गर्वाने वागत होते हे तुला ठाऊक होते; तू आपल्या नामाचा महिमा प्रकट केला; तो आजवर आहे.
11तू त्यांच्यासमोरून समुद्र दुभंग केला, असा की ते समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून चालून गेले; धोंडा महाजलाशयात टाकावा त्याप्रमाणे तू त्यांचा पाठलाग करणार्यांना समुद्रतळी फेकले.
12तू त्यांना दिवसा मेघस्तंभाने आणि रात्री ज्या वाटेने त्यांनी जायचे तिच्यावर प्रकाश मिळावा म्हणून अग्निस्तंभाने त्यांना नेले.
13तू सीनाय पर्वतावर उतरून त्यांच्याशी स्वर्गातून बोललास आणि त्यांना योग्य निर्णय, खरे कायदे, चांगले नियम व आज्ञा लावून दिल्या;
14तू त्यांना आपल्या पवित्र शब्बाथाचा परिचय करून दिला, आणि तुझा सेवक मोशे ह्याच्या हस्ते तू त्यांना आज्ञा, नियम व नियमशास्त्र ही विहित केली.
15आणि त्यांची क्षुधा भागवण्यासाठी तू आकाशातून त्यांना अन्न दिले, त्यांची तृषा शमवण्यासाठी खडकातून पाणी काढले आणि त्यांना अशी आज्ञा केली की जो देश तुम्हांला देण्यासाठी मी बाहू उभारून आणभाक केली आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तुम्ही त्यात जा.
16तथापि त्यांनी व आमच्या पूर्वजांनी उन्मत्त होऊन आपली मान ताठ केली व तुझ्या आज्ञांचा अवमान केला;
17त्यांनी हुकूम मानण्याचे नाकारले, आणि जी आश्चर्यकृत्ये तू त्यांच्यामध्ये केली होतीस त्यांची त्यांनी पर्वा केली नाही; पण त्यांनी आपली मान ताठ करून एवढे बंड केले की आपल्या दास्यात परत जाण्यासाठी त्यांनी एक नायक नेमला; पण तू क्षमाशील, कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय देव आहेस; तू त्यांचा त्याग केला नाहीस.
18त्यांनी ओतीव वासरू केले व ज्या देवाने तुला मिसर देशातून सोडवून आणले तोच हा असे म्हणून तुला संताप आणणारी कामे केली.
19तथापि तू अति दयाळू असल्याकारणाने त्यांना तू रानात सोडून दिले नाहीस; दिवसा त्यांचा मार्गदर्शक मेघस्तंभ त्यांच्यावरून ढळला नाही आणि रात्रीचा प्रकाश देऊन नीट मार्ग दाखवणारा अग्निस्तंभही ढळला नाही.
20त्याप्रमाणे शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून तू त्यांना आपला सदात्मा दिलास; त्यांच्या तोंडचा मान्ना तू काढून घेतला नाहीस; आणि त्यांची तृषा शांत करण्यासाठी तू त्यांना पाणी देत राहिलास.
21चाळीस वर्षे जंगलात तू त्यांचे असे पालनपोषण केलेस की त्यांना कशाचीही वाण पडली नाही; त्यांची वस्त्रे जीर्ण झाली नाहीत; त्यांच्या पायांना सूज आली नाही.
22मग तू त्यांना देशोदेशीचे लोक अंकित करून दिले आणि त्यांच्या चतुःसीमा नेमून दिल्या, त्याप्रमाणेच हेशबोनचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग ह्या दोघांच्या देशांचे वतन त्यांना प्राप्त झाले.
23तू त्यांचे वंशज आकाशातील तार्यांप्रमाणे बहुगुणित केले आणि ज्या देशात जाऊन तुम्ही त्यांचे वतन पावाल म्हणून तू त्यांच्या पूर्वजांना सांगितले होते, त्या देशात तू त्यांना नेऊन पोचवले.
24त्याप्रमाणेच त्यांच्या वंशजांनी त्या देशात जाऊन त्याचा ताबा घेतला; तू त्यांच्यादेखत देशातले कनानी रहिवासी ह्यांना पादाक्रांत केले; त्यांचे राजे व देशाचे लोक ह्यांचे वाटेल ते करावे म्हणून त्यांना तू त्यांच्या हाती दिलेस.
25त्यांनी तटबंदीची नगरे व सुपीक भूमी काबीज केली, आणि उत्तमोत्तम वस्तूंनी भरलेली घरे, खोदलेले हौद, द्राक्षांचे मळे, जैतुनांचे मळे व विपुल फळझाडे ह्यांचा ताबा घेतला; ते खाऊन तृप्त झाले, धष्टपुष्ट झाले आणि तुझ्या अतिशय चांगुलपणामुळे सुख पावले.
26पण त्यांनी आज्ञाभंग करून तुझ्याविरुद्ध बंड केले; तुझे नियमशास्त्र त्यांनी पाठीमागे फेकून दिले; तुझ्याकडे त्यांनी पुन्हा वळावे असे ज्या तुझ्या संदेष्ट्यांनी निक्षून सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले आणि तुला संतप्त केले.
27त्यामुळे तू त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले; त्यांनी त्यांना संकटात घातले; तरी आपल्या विपत्काळी त्यांनी तुझा धावा केला; तो तू स्वर्गातून ऐकलास व तुझ्या दयेच्या बहुत कृत्यांना अनुसरून त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून सोडवण्यासाठी तू त्यांना सोडवणारे दिलेस.
28पण जेव्हा जेव्हा त्यांना स्वास्थ्य मिळे तेव्हा तेव्हा ते तुझ्यासमोर दुष्कर्म करीत; ह्यामुळे तू त्यांना शत्रूंच्या हाती दिलेस व त्यांनी त्यांच्यावर सत्ता केली; तरी त्यांनी तुझ्याकडे वळून तुझा धावा केला, तो तू स्वर्गातून ऐकला आणि तुझ्या दयेच्या कृत्यांना अनुसरून तू त्यांना अनेक वेळा मुक्त केलेस.
29त्यांना पुन्हा नियमशास्त्राप्रत आणावे म्हणून तू त्यांना बजावून सांगितले तरी त्यांनी उन्मत्त होऊन तुझ्या आज्ञांचा अवमान केला आणि जे निर्णय पाळल्याने मनुष्य जिवंत राहतो ते न जुमानता त्यांनी पाप केले; त्यांनी आपला खांदा जुवाखालून काढून घेतला, मान ताठ केली व ते ऐकतनासे झाले.
30तू पुष्कळ वर्षे त्यांची गय केलीस व आपल्या आत्म्याने संदेष्ट्यांच्या द्वारे त्यांना बजावत आलास; पण त्यांनी कान दिला नाही म्हणून तू त्यांना अनेक देशांतील लोकांच्या हाती दिलेस.
31तरी तू आपल्या दयेच्या बहुत कृत्यांना अनुसरून त्यांचा पुरा अंत केला नाहीस, त्यांचा त्याग केला नाहीस, कारण तू कृपाळू व दयाळू देव आहेस.
32तर आता हे आमच्या देवा, हे थोर, पराक्रमी व भयावह देवा, आपला करार व दया कायम राखणार्या देवा, अश्शूरी राजाच्या काळापासून आजपर्यंत आम्हांला, आमच्या राजांना, आमच्या अधिपतींना, आमच्या याजकांना, आमच्या संदेष्ट्यांना, आमच्या वाडवडिलांना आणि तुझ्या सर्व लोकांना जे कष्ट झाले आहेत ते क्षुल्लक लेखू नकोस.
33आमच्यावर जे काही गुदरले आहे त्याच्या बाबतीत तू न्यायशील आहेस; तू आमच्याशी सत्यतेने वागलास पण आम्ही दुष्टाई केली आहे.
34आमचे राजे, अधिपती, याजक आणि वाडवडील ह्यांनी तुझे नियमशास्त्र पाळले नाही, आणि आपल्या ज्या आज्ञांच्या व निर्बंधांच्या योगे तू त्यांना बजावले त्यांकडे त्यांनी लक्ष दिले नाही.
35त्यांनी आपल्या राज्यात तुझी सेवा केली नाही; तू त्यांचे मोठे कल्याण केलेस, आणि तू त्यांना विस्तृत व सुपीक भूमी दिली, तरीही तुझी सेवा त्यांनी केली नाही आणि आपल्या दुष्कर्मापासून ते परावृत्त झाले नाहीत.
36पाहा, आज आम्ही दास बनलो आहोत; आमच्या पूर्वजांनी उत्तम उत्पन्न उपभोगावे म्हणून जो देश तू त्यांना दिलास त्यात आम्ही केवळ दास आहोत.
37आमच्या पापांमुळे जे राजे तू आमच्यावर नेमले आहेत त्यांना ह्या देशाचे पुष्कळ उत्पन्न मिळत आहे; ते आमच्या देहांवर व आमच्या गुराढोरांवर हवी तशी सत्ता चालवत आहेत; आम्ही फार फार संकटात आहोत.”
नियमशास्त्र पाळण्याविषयी लोकांची प्रतिज्ञा
38ह्या सर्व कारणांस्तव आम्ही दृढ करार करतो व लिहून देतो, आणि आमचे अधिपती, लेवी व याजक हे त्याच्यावर मोहर करीत आहेत.
सध्या निवडलेले:
नहेम्या 9: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: