स्तोत्रसंहिता 103
103
देवाच्या उपकारांबद्दल धन्यवाद
दाविदाचे स्तोत्र.
1हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.
2हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस;
3तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो; तो तुझे सर्व रोग बरे करतो;
4तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो; तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालतो;
5तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो; म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते.
6जाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करतो;
7त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्राएलाच्या वंशजांना विदित केली.
8परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे.
9तो सर्वदाच दोष देत राहणार नाही; तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही.
10आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हांला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिले नाही.
11कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्यांचे भय धरणार्यांवर विपुल आहे.
12पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.
13जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणार्यांवर ममता करतो.
14कारण तो आमची प्रकृती जाणतो; आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो.
15मानवप्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे; वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो.
16वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते, आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही;
17परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणार्यांवर युगानुयुग असते, आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांना घडतो;
18म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो.
19परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे; त्याचे राज्य सर्वांवर आहे.
20अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात, आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा.
21अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जे तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा.
22परमेश्वराच्या सर्व कृत्यांनो, त्याच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणी त्याचा धन्यवाद करा; हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 103: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: