YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 13

13
संकटसमयी साहाय्यासाठी प्रार्थना
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? सर्वकाळ काय? तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपवणार?
2मी कोठवर आपल्या मनात बेत योजत राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?
3हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे पाहा, मला उत्तर दे; मला मृत्युनिद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे प्रकाशित कर;
4नाहीतर “मी ह्याला जिंकले” असे माझा वैरी म्हणेल; आणि मी ढळलो असता माझे शत्रू उल्लासतील.
5मी तर तुझ्या दयेवर भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्लासेल.
6परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत, म्हणून मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 13: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन