स्तोत्रसंहिता 138
138
परमेश्वराच्या कृपाप्रसादाबद्दल उपकारस्तुती
दाविदाचे स्तोत्र.
1मी अगदी मनापासून तुझे उपकारस्मरण करीन; देवांच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन.
2तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन, तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकारस्मरण करीन; कारण तू आपल्या संपूर्ण नावांहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस.
3मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकलास; तू मला हिम्मत दिलीस तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.
4हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकारस्मरण करतील; कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत.
5ते परमेश्वराच्या मार्गांविषयी गातील; कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे.
6परमेश्वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो; पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.
7मी संकटांतून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस; माझ्या वैर्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवतोस, आणि तुझा उजवा हात माझा बचाव करतो.
8परमेश्वर माझ्याविषयी सर्वकाही सिद्धीस नेईल; हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे; तू आपल्या हातचे काम सोडू नकोस.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 138: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: