YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 14

14
मानवाचा मूढपणा व त्याची दुष्टाई
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र.
1मूढ आपल्या मनात म्हणतो, “देव नाही,” लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करतात, सत्कर्म करणारा कोणी नाही.
2कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले;
3ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत; एकूणएक बिघडला आहे, सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही.
4सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय? ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात, परमेश्वराचे नाव घेत नाहीत.
5पाहा, ते अतिशय भयभीत झाले आहेत, कारण देव नीतिमान लोकांत वस्ती करतो
6दीनाच्या सल्लामसलतीची तुम्ही अवहेलना करू पाहता, पण त्याचा आश्रय परमेश्वर आहे.
7देव करो आणि सीयोनेतून इस्राएलाचा उद्धार होवो. परमेश्वर आपल्या लोकांचे दास्य उलटवील, तेव्हा याकोब उल्लासेल, इस्राएल हर्ष पावेल.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 14: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन