स्तोत्रसंहिता 143
143
सुटका आणि मार्गदर्शन ह्यांसाठी प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या विनवणीकडे कान दे; तू आपल्या सत्यतेने व न्याय्यत्वाने माझे ऐक.
2तू आपल्या दासाचा न्यायनिवाडा करू नकोस; कारण तुझ्यापुढे कोणीही जिवंत मनुष्य नीतिमान ठरणार नाही.
3वैरी माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहे; त्याने माझे जीवन धुळीस मिळवले आहे; पुरातन काळी मृत झालेल्यांप्रमाणे मला त्याने अंधकाराच्या स्थळी राहण्यास लावले आहे.
4माझा आत्मा माझ्या ठायी व्याकूळ झाला आहे; माझे अंतर्याम घाबरे झाले आहे.
5मी प्राचीन काळचे दिवस मनात आणतो; तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करतो; तुझ्या हातच्या कृतींचे चिंतन करतो.
6मी आपले हात तुझ्यापुढे पसरतो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे.
(सेला)
7हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक; माझा आत्मा गळून गेला आहे; तू आपले तोंड माझ्यापासून लपवू नकोस; लपवशील तर मी गर्तेत उतरणार्यांसारखा होईन.
8प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे; कारण तुझ्यावर माझा भाव आहे; ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळव कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लावले आहे.
9हे परमेश्वरा, माझ्या वैर्यांपासून मला मुक्त कर; मी तुझ्या पाठीशी येऊन लपलो आहे.
10तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव; कारण तू माझा देव आहेस; तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेवो.
11हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी मला नवजीवन दे; तू आपल्या न्यायाने माझा जीव संकटांतून बाहेर काढ.
12तू आपल्या दयेने माझ्या वैर्यांचा नायनाट कर; माझ्या जिवाला गांजणार्या सर्वांचा नाश कर; कारण मी तुझा दास आहे.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 143: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: