YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 149

149
इस्राएलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेश
1परमेशाचे स्तवन करा!1 नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा.
2इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो; सीयोनेची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावोत.
3ती नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करोत. डफ व वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत.
4कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे; तो दीनांना तारणाने सुशोभित करतो.
5भक्त गौरवामुळे उल्लासोत; ते आपल्या अंथरुणांवरून हर्षघोष करोत.
6परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो; दुधारी तलवार त्यांच्या हाती असो;
7तिच्या योगे राष्ट्रांचा सूड त्यांनी उगवावा आणि लोकांना शासन करावे.
8त्यांच्या राजांना साखळदंडांनी बांधावे आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्या घालाव्यात.
9लिहून ठेवलेला निवाडा त्यांच्यावर बजवावा, हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल. परमेशाचे स्तवन करा!1

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 149: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन