स्तोत्रसंहिता 17
17
जुलूम करणार्यांपासून संरक्षणासाठी प्रार्थना
दाविदाची प्रार्थना.
1हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे.
2माझा निवाडा तुझ्यापुढे होवो; तुझे डोळे समदृष्टीने पाहोत.
3तू माझे हृदय पारखले आहेस, रात्री तू माझी झडती घेतली आहेस, तू मला तावूनसुलाखून पाहिले आहेस, तरी तुला काही आढळले नाही; मी मुखाने अतिक्रमण करणार नाही, असा संकल्प मी केला आहे.
4माणसांच्या कृत्यांविषयी म्हटले, तर तुझ्या तोंडच्या वचनामुळे मी स्वतःला जबरदस्त माणसांच्या मार्गांपासून दूर ठेवले आहे.
5माझी पावले तुझ्याच मार्गाला धरून आहेत, माझे पाय घसरले नाहीत.
6मी तुझा धावा केला आहे, कारण, हे देवा, तू माझे ऐकतोस; माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक.
7तुझा आश्रय करणार्यांना त्यांच्या विरोध्यांपासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवतोस; तर तू आता विशेष वात्सल्य दाखव.
8मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखांच्या छायेत लपव,
9कारण दुर्जन माझ्यावर जुलूम करतात, माझे हाडवैरी मला घेरतात.
10त्यांना चरबी चढली आहे; ते आपल्या मुखाने गर्वाचे भाषण करतात.
11आता ते पावलोपावली आम्हांला घेरत आहेत; ते आम्हांला धुळीस मिळवू पाहत आहेत.
12भक्ष्य फाडण्यास उतावळा झालेल्या सिंहासारखा किंवा टपून बसलेल्या तरुण सिंहासारखा, तो आहे.
13हे परमेश्वरा, ऊठ, त्याच्याशी सामना कर, त्याला चीत कर; आपल्या तलवारीने दुर्जनांपासून माझा जीव सोडव.
14हे परमेश्वरा, आपले वतन इहलोकीच आहे असे ज्यांना वाटते, ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरतोस, अशा मानवांपासून ऐहिक मानवांपासून, आपल्या हाताने माझा जीव सोडव; ते आपल्या संततीतच तृप्त असोत, आणि आपण साठवलेले धन आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवोत;
15मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 17: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: