स्तोत्रसंहिता 22
22
दु:खाची आरोळी आणि स्तुतिगीत
मुख्य गवयासाठी; अय्येलेथ हश्शहर (प्रभातहरिणी) ह्या रागावर गायचे दाविदाचे स्तोत्र.
1माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस.
2माझ्या देवा, दिवसा मी धावा करतो तरी तू ऐकत नाहीस; रात्रीही धावा करतो तरी मला चैन पडत नाही.
3तरीपण, हे इस्राएलाच्या स्तवनात वसणार्या, तू पवित्र आहेस.
4आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवत; ते तुझ्यावर भाव ठेवत असत आणि तू त्यांना मुक्त करत होतास.
5ते तुझा धावा करत आणि मुक्त होत. ते तुझ्यावर भाव ठेवत, आणि निराश होत नसत.
6मी तर कीटक आहे, मानव नव्हे; मनुष्यांनी निंदलेला, लोकांनी धिक्कारलेला आहे.
7मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात, वाकुल्या दाखवतात, थट्टेने डोके डोलवतात;
8ते म्हणतात, “त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला आहे; तो त्याला मुक्त करो; तो त्याला सोडवो, कारण तो त्याचा आवडता आहे.”
9परंतु मला उदरातून बाहेर आणणारा तूच आहेस; मी आपल्या आईच्या अंगावर पीत होतो तेव्हा तू मला तुझ्यावर भाव ठेवण्याची स्फूर्ती दिलीस.
10मी जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपवलेले आहे; मातेच्या उदरातून बाहेर पडलो तेव्हापासून तूच माझा देव आहेस.
11माझ्यापासून दूर राहू नकोस, कारण संकट येऊन ठेपले आहे; आणि साहाय्य करणारा कोणी नाही.
12पुष्कळ गोर्ह्यांनी मला वेढले आहे; बाशानातील दांडग्या गोर्ह्यांनी मला घेरले आहे.
13फाडून टाकणार्या व गर्जना करणार्या सिंहासारखे ते तोंड वासून माझ्यावर आले आहेत.
14मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे; माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्या आत वितळले आहे.
15माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तू मला मरणाच्या धुळीस मिळवत आहेस.
16कुत्र्यांनी मला वेढले आहे; दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे; त्यांनी माझे हातपाय विंधले आहेत.
17मला आपली सर्व हाडे मोजता येतात; ते माझ्याकडे टक लावून पाहतात.
18ते माझी वस्त्रे आपसांत वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतात.
19तर तू, हे परमेश्वरा, मला अंतर देऊ नकोस; हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साहाय्यासाठी त्वरा कर.
20तू माझा जीव तलवारीपासून सोडव; कुत्र्याच्या पंजांतून माझा प्राण सोडव.
21सिंहाच्या जबड्यापासून मला वाचव, रानबैलांनी मला शिंगांवर घेतले असता तू माझा धावा ऐकलास.
22मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन; मंडळीत तुझे स्तवन करीन.
23अहो परमेश्वराचे भय धरणार्यांनो, त्याचे स्तवन करा; याकोबाचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचा गौरव करा; इस्राएलाचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचे भय धरा.
24कारण त्याने पीडिताची दैन्यावस्था तुच्छ लेखली नाही व तिचा वीट मानला नाही. त्याने आपले मुख त्याच्या दृष्टिआड केले नाही; तर पीडिताने धावा केला तेव्हा त्याने तो ऐकला.
25महामंडळात तुझ्यामुळेच मी स्तवन करतो; त्याच्या भक्तांसमक्ष मी आपले नवस फेडीन.
26दीन जन अन्न सेवन करून तृप्त होतील; परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करतील; तुम्ही चिरंजीव असा.
27दिगंतरीचे सर्व जन परमेश्वराला स्मरून त्याच्याकडे वळतील; सगळी राष्ट्रकुले तुला दंडवत घालतील.
28कारण राज्य परमेश्वराचे आहे; तोच राष्ट्रांचा शास्ता आहे.
29पृथ्वीवरील सर्व थोर लोक भोजन करतील व त्याला भजतील; धुळीस मिळणारे सर्व त्याला नमन करतील, ज्याला आपला जीव वाचवता येत नाही तोही नमेल.
30त्यांचे वंशजही त्याची सेवा करतील; पुढील पिढीच्या लोकांना प्रभूविषयी कथन करतील.
31तेही येऊन भावी पिढीला त्याचे न्याय्यत्व कळवतील. त्यानेच हे सिद्धीस नेले असे म्हणतील.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 22: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: