स्तोत्रसंहिता 26
26
सात्त्विकतेचा दावा
दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, माझा न्याय कर, कारण मी सात्त्विकपणे वागलो आहे, आणि परमेश्वरावर भरवसा ठेवला आहे; मी घसरणार नाही.
2हे परमेश्वरा, मला कसास लाव, माझी पारख कर; माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पाहा.
3तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे; तुझ्या सत्यमार्गाने मी चाललो आहे.
4अधम लोकांत मी बसलो नाही; कपटी लोकांची संगत मी धरणार नाही.
5दुष्कर्म्यांच्या सभेचा मी द्वेष करतो; दुर्जनांबरोबर मी बसणार नाही.
6हे परमेश्वरा, मी निर्दोषतेने आपले हात धुईन आणि तुझ्या वेदीला फेरा घालीन;
7म्हणजे मी प्रकटपणे तुझे उपकारस्मरण करीन व तुझी सर्व आश्चर्यकर्मे वर्णन करीन.
8हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत.
9पातक्यांबरोबर माझा जीव आणि पातकी मनुष्यांबरोबर माझा प्राण काढून नेऊ नकोस;
10त्यांचे हात उपद्रवाने भरलेले आहेत, त्यांचा उजवा हात लाचलुचपतींनी भरलेला आहे.
11मी तर सात्त्विकपणे वागेन; माझा उद्धार कर, माझ्यावर दया कर.
12माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर आहे; जनसभांत मी परमेश्वराचा धन्यवाद करीन.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 26: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: