स्तोत्रसंहिता 36
36
देवाचे अढळ प्रेम
मुख्य गवयासाठी; परमेश्वराचा सेवक दावीद ह्याचे स्तोत्र.
1दुर्जनाच्या मनातून अधर्माचा ध्वनी निघत असतो; त्याच्या दृष्टीपुढे देवाचे भय नाही.
2आपले पाप उघडकीस येणार नाही, त्याचा कोणी तिटकारा करणार नाही, अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो.
3त्याच्या तोंडचे शब्द अनीतीचे व कपटाचे असतात; त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिली आहेत.
4तो अंथरुणावर पडल्यापडल्या अनीतीच्या योजना करतो; तो कुमार्ग धरून राहतो, वाइटाचा वीट मानत नाही.
5हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहचले आहे; तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे
6तुझे नीतिमत्त्व महान1 पर्वतांसारखे आहे; तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत; हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशू ह्यांचा प्रतिपाळ करतोस.
7हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे! मानवजाती तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय करते!
8तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल, आणि तू आपल्या सुखांच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील.
9कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे; तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो.
10तुला ओळखणार्यांस तुझे वात्सल्य सरळ मनाच्यांस तुझे नीतिमत्त्व लाभू दे.
11गर्विष्ठाचा पाय मला न तुडवो; दुर्जनांचा हात मला हाकून न लावो.
12पाहा, दुष्कर्म करणारे तेथे पडले आहेत! त्यांना लोटून दिले आहे, त्यांच्याने उठवणार नाही.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 36: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: