स्तोत्रसंहिता 39
39
आयुष्याची क्षणभंगुरता
मुख्य गवई यदूथून ह्याच्यासाठी दाविदाचे स्तोत्र.
1मी म्हणालो की, “मी आपल्या जिभेने पाप करू नये म्हणून आपल्या चालचलणुकीस जपेन; माझ्यासमोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन.”
2मौन धरून मी गप्प राहिलो, बरेदेखील काही बोललो नाही, तरी माझ्या दु:खाने उचल खाल्ली.
3माझे हृदय आतल्या आत संतप्त झाले; मला ध्यास लागला असता माझ्यामध्ये अग्नी भडकला, तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो;
4“हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे, व माझे आयुष्यमान किती आहे, हे मला समजू दे; म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला कळेल.
5पाहा, तू माझे दिवस वीतभर केले आहेत; माझ्या आयुष्याचा काळ तुझ्यापुढे काही नाही; एखादा मनुष्य कितीही खंबीर असला तरी तो श्वासरूपच होय, हे खास.
(सेला)
6खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगाच धामधूम करतो, तो धन साठवतो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही.
7तर आता हे प्रभू, मी कशाची अपेक्षा करू? माझी आशा तुझ्याच ठायी आहे.
8माझ्या सर्व अपराधांपासून मला सोडव; मला मूर्खांच्या निंदेस पात्र करू नकोस.
9मी मौन धरले आहे, आपले तोंड उघडत नाही, कारण हे तूच केले आहेस.
10तुझा प्रहार माझ्यावरून दूर कर; तुझ्या हाताच्या तडाख्याने माझा क्षय होत आहे.
11तू मनुष्याला अनीतीबद्दल धमकावून शासन करतोस, तेव्हा तू त्याचे सौंदर्य पतंगाप्रमाणे विलयास नेतोस; खरोखर सर्व माणसे श्वासवत आहेत.
(सेला)
12हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या धाव्याकडे कान लाव; माझे अश्रू पाहून उगा राहू नकोस; कारण मी आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यापुढे परदेशीय व उपरा आहे.
13मी येथून जाऊन नाहीसा होण्यापूर्वी आनंदित व्हावे म्हणून माझ्यावर असलेली तुझी क्रोधदृष्टी काढ.”
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 39: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: